आमदाराचं मॉडेलशी लग्न; बापाचा फोटो दिसताच लेक लागली रडू…

bjp-mla-hiran-chatterjee
Share

कोलकता: पश्चिम बंगालमधील खडगपूरचे भाजप आमदार आणि बंगाली अभिनेते हिरन चॅटर्जी यांनी मॉडेल रितिका गिरीशी वाराणसीमध्ये लग्न केल्यानंतर खळबळ उडाली आहे. हिरन चटर्जी यांच्या पहिल्या पत्नी अनिंदिता चटर्जी यांनी हिरन यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

अनिंदिता यांनी हिरन यांच्यावर छळाचे गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी नमूद केले की, त्या गेल्या अनेक काळापासून हा त्रास सहन करत होत्या, परंतु केवळ त्यांच्या मुलीच्या भविष्यासाठी आणि कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठी गप्प होत्या. हिरन यांची 19 वर्षांची मुलगी नियासा चटर्जी हिला वडिलांच्या लग्नाबद्दल कोणतीही माहिती नव्हती. तिला या लग्नाबद्दल सोशल मीडियावरील फोटोंद्वारे समजल्यानंतर मोठा मानसिक धक्का बसला आणि रडू लागली. तिने सार्वजनिकरीत्या आपल्या वडिलांवर टीका करताना वडील म्हणून अपयशी म्हटले असून, आईला पाठिंबा दिला आहे.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

दुसरी पत्नी रितिका गिरीने असा दावा केला आहे की अनिंदिता यांना त्यांच्या नात्याबद्दल माहिती होती आणि त्यांना घटस्फोटाची नोटीस देखील पाठवण्यात आली होती. मात्र, अनिंदिता यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले असून रितिकाचे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. अनिंदिताने दिलेल्या माहितीनुसार रितिका गिरी 2021 च्या निवडणूक प्रचारादरम्यान पक्ष कार्यकर्ती म्हणून काम करत होती. त्यावेळी त्यांच्या प्रेमाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या आणि रितिकाच्या सोशल मीडिया अकाउंटवर हिरन यांचे फोटो असायचे, पण त्यात त्यांचा चेहरा लपवलेला असायचा. लग्नाची बातमी समोर आल्यापासून हिरन चटर्जी यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीशी किंवा मुलीशी कोणताही संपर्क साधलेला नाही. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक असताना हा वाद समोर आला आहे. हिरन चॅटर्जी यांना दिलीप घोष यांनी भाजपमध्ये आणले होते. आमदार हिरन चॅटर्जी यांनी अद्याप या आरोपांना कोणतेही उत्तर दिलेले नाही आणि भाजप पक्षानेही या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *