मुंबईः मतदारसंघ पुनर्रचना म्हणजे डिलिमिटेशन बाबत शरद पवार मला अनौपचारिक चर्चेत म्हणाले होते की, मतदारसंघ पुनर्रचना गरजेचे असते असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले. डिलिमिटेशन हे घटनात्मक आहे ते करावं लागतं त्याला काही पर्याय नसतो, असे मला साहेब म्हणाले होते असे आव्हाड यांनी सांगितले. पवारसाहेब माझे दैवत आहेत, साहेबांची जी भूमिका आहे तीच माझी भूमिका आहे. आठ खासदारांना घेऊन सुप्रिया सुळे यांनी घेतलेला निर्णय अंतिम असेल. डिलिमिटेशनला पाठिंबा देण्याचा आमचा निर्णय झाल्याचेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
जितेंद्र आव्हाड यांनी आज ब्रीच कॅन्डी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. यानंतर प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. पवारसाहेब मला म्हणाले की, ‘मतदारसंघ पुनर्रचना गरजेचे असते. उद्या किंवा परवा पवारसाहेबांना डिस्चार्ज मिळू शकतो.’
View this post on Instagram
संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, 1986 पासून मी शरद पवार यांच्यासोबत आहे. त्यामुळं निष्ठा काय आहे हे मला माहित आहे. मी त्यांना दैवत मानतो, त्यांचा निर्णय आमच्यासाठी अंतिम असणार आहे.
दरम्यान, डिलिमिटेशन विधेयक लपूनछपून आणले जात असल्याची टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. लोकसभेत 50 टक्के जागा वाढविण्यास आमचा विरोध असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. डिमिलिटिशेनच्या विरोधात नाही, पण तुलनात्मक खासदार संख्या बदलू नका असेही ते म्हणाले. महिला आरक्षण जागा न वाढविता उत्तर प्रदेश निवडणुकीपासून त्वरित लागू करा असेही चव्हाण म्हणाले. मागच्या दाराने लपून-छपून विधेयक आणले जात असल्याचा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केलाय. आमचाही डिलिमिटेशनला विरोध नाही पण आमचे काही मुद्दे आहेत, त्यामध्ये बदल केले पाहिजेत असे पृथ्वाराज चव्हाण म्हणाले. डिलिमिटेशन हा घटनेचा अत्यंत महत्वाचा भाग आहे.
मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाच्या विधेयकातील दुरुस्त्यांना मंत्रिमंडळाची मंजूरी…
राष्ट्रवादीनं काढला व्हिप, व्हिपमध्ये काय? खासदारांना काय आदेश…
One thought on “मोठी बातमी! मतदारसंघ पुनर्रचनेला पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा जाहीर; माझे दैवत…”