मुंबई: केंद्र सरकारने ३० नोव्हेंबर रोजी बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. याच अधिवेशनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या सर्व लोकसभा खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्यासाठी अधिकृत व्हीप (पक्षादेश) बजावला आहे. पक्षाचे लोकसभेतील प्रतोद खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी हा तीन ओळींचा व्हीप जारी केला आहे.
केंद्र सरकारने ३० नोव्हेंबर रोजी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात सरकारकडून घटनादुरुस्ती विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सभागृहातील मतदान आणि कामकाजादरम्यान पक्षाची एकजूट कायम राहावी आणि सर्व खासदारांची उपस्थिती निश्चित व्हावी, या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ही खबरदारी घेतली आहे. लोकसभेत पवारांच्या राष्ट्रवादीकडे ८ खासदार आहेत.
View this post on Instagram
लोकसभेचे प्रतोद या नात्याने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पक्षाच्या सर्व खासदारांना हा तीन ओळींचा आदेश पाठवला आहे. संसदीय कार्यप्रणालीनुसार, तीन ओळींचा व्हीप हा अत्यंत महत्त्वाचा आणि बंधनकारक मानला जातो. या आदेशानुसार, संबंधित पक्षाच्या सर्व खासदारांना ठरलेल्या दिवशी सभागृहात प्रत्यक्ष हजर राहून पक्षाच्या भूमिकेनुसार मतदान करणे किंवा कामकाजात सहभागी होणे आवश्यक असते. या आदेशाचे उल्लंघन केल्यास पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत कारवाई होऊ शकते. त्यामुळे विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाने उचललेले हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.
देवेंद्र फडणवीस यांना पुण्याचे पालकमंत्री केलं तर आणखी वाटोळं होईल : रोहित पवार
पुणे! ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहिमेत महापौर मंजुषा नागपुरे यांनाच घरचा आहेर…
राज्य मंत्रिमंडळाचे 14 धडाकेबाज निर्णय; पुढील तीन महिने मोफत धान्य…