मुंबईः संसदेच्या विशेष अधिवेशनात मतदारसंघ पुर्नरचना विधेयक अर्थात डिलिमटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरुन शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने इंडिया आघाडीने ऐनवेळी निर्णय बदलला आहे.
भाजपप्रणित एनडीएने पावसाळी अधिवेशनात डिलिमटेशन विधेयक (delimitation bill) मांडले होते तेव्हा विरोधकांनी एकजुटीने ते हाणून पाडले होते. मात्र, आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला साथ देण्याचे ठरवल्याचे आहे. कालच शरद पवार यांच्या पक्षाकडून तसे स्पष्ट संकेत देण्यात आले होते. मात्र, शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार शनिवारी दिल्लीत होणऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहतील, असे सांगितले जात होते.
View this post on Instagram
सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीचे कारण देत या बैठकीला येणार नसल्याचे अगोदरच स्पष्ट केले होते. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निलेश लंके या बैठकीला जाणार असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून इंडिया आघाडी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा न देण्यासाठी शरद पवार गटाची मनधरणी करु शकते, अशी शक्यता होती. परंतु, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनेही ही शेवटची शक्यताही संपवून टाकली आहे. कारण, आज दिल्लीत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला शरद पवार गटाचा एकही खासदार उपस्थित राहणार नाही.
खासदार निलेश लंके बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती कालपर्यंत होती. मात्र, आजचा दिवस उजाडताच निलेश लंके हे आज गड किल्ले स्वच्छता मोहिमेसाठी तोरणा किल्ल्यावर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार भास्कर भगरे हेदेखील आज महाराष्ट्रातच असल्याची माहिती आहे. त्यामुळे इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा एकही खासदार उपस्थित नसेल, हे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, इंडिया आघाडीकडून डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधात आजच्या बैठकीत रणनीती ठरवली जाणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी सकाळी 11.30 वाजता ही बैठक होणार आहे. तर भाजपनेही 29 नोव्हेंबर म्हणजे उद्या दिल्लीत आपल्या सर्व लोकसभा खासदारांची बैठक बोलावली आहे. संसदेचं अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस आधी बोलवण्यात आलेल्या बैठकीत सोमवार आणि मंगळवारच्या संसदीय अधिवेशनासाठी सर्व खासदारांची उपस्थिती सुनिश्चित केली जाईल.
मोठी बातमी! मतदारसंघ पुनर्रचनेला पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा जाहीर; माझे दैवत…
मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाच्या विधेयकातील दुरुस्त्यांना मंत्रिमंडळाची मंजूरी…
राष्ट्रवादीनं काढला व्हिप, व्हिपमध्ये काय? खासदारांना काय आदेश…
One thought on “भाजपला साथ! शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने ऐनवेळी निर्णय बदलला…”