मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा…

narhari-zirwal
Share

नांदेड: अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जवळपास ४० आमदारांनी भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत जाणे पसंत केले. अजित पवार यांनी सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेण्यामागे राष्ट्रवादीचे वरिष्ठ चार-पाच नेते होते, अशी चर्चा शरद पवार यांच्या पक्षात होती. हेच नेते शरद पवार यांच्या निशाण्यावर होते, अशीही मधल्या काळात चर्चा झाली. याच चर्चांच्या अनुषंगाने मंत्री नरहरी झिरवाळ यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आदिवासी समाजाचे कार्यकर्ते जयंत वानोळे यांच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यक्रमात मंत्री नरहरी झिरवाळ उपस्थित राहिले.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

माझ्या बाबतीत शरद पवार साहेबांच्या डोक्यात कधीही संशयाचे भूत राहत नाही. मी जिथे जातो, तिथे प्लेन काम करतो. एवढाच मला शेरा मिळतो आणि त्याच्यावरच मी खूष राहतो, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून कार्यक्रम असतानाही झिरवाळ उपस्थित राहिले. याच कार्यक्रमावरून शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला उद्देशून त्यांनी हे वक्तव्य केले.

शरद पवारांच्या डोक्यात माझ्याबद्दल संशयाचे भूत राहत नाही, असे झिरवाळ म्हणाले. परंतु पवारांच्या मनात कुणाबद्दल संशयाचे भूत आहे, हा प्रश्न मात्र त्यांनी अनुत्तरित ठेवला. महत्त्वाचे म्हणजे असे काही नेते आहेत, ज्यांच्याबद्दल पवारांच्या मनात संशयाचे भूत आहे, असे अप्रत्यक्षपणे झिरवाळ यांनी सांगितले. मंत्री नरहरी झिरवाळा यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

राजस्थानमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट…

नगरसेवकाची थेट महापालिका सहायक आयुक्तालाच मारहाण, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद…

सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सरकारला घरचा अहेर…

One thought on “मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!