पुणे : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी शुक्रवारी पार पडलेल्या मतदानानंतर आज (मंगळवार) सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर काहीकाळ गोंधळ निर्माण झाल्याचं दिसून आलं आहे. आठ मतपेट्यांना सील नसल्याचा दावा करत महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षदा देशमुख यांनी आक्षेप घेतला आहे. यावरून निवडणूक अधिकारी आणि मतदार प्रतिनिधी यांच्यात गोंधळ निर्माण झाला. गोंधळामुळे काहीवेळ मतमोजणी प्रक्रिया थांबवली असल्याची माहिती समोर आली आहे.
एकूण तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या या रणधुमाणीमध्ये तब्बल 182 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीमध्ये बंद झाले आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातील आठ मतपेट्यांमध्ये सील नसल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीचे सर्व प्रतिनिधी एकत्र जमले आहेत, आतमध्ये तारा आणि सील तुटलेले असताना आम्ही त्यावरती आक्षेप घेतला, त्यावरती आम्हाला सांगितलं गेलं हे बरोबर आहे, आमची तक्रार देखील नोंद करून घेतली नाही, व्हिडीओ रेकॉर्डिंग केलं, आम्हाला सांगितलं की ते व्हिडीओ रेकॉर्डिंग आम्ही तुम्हाला देऊ, पण ते देणार कधी, आज निवडणूक आहे, तेथील निवडणुकीतले निरीक्षक आहेत त्यांच्यासमोर आम्ही आमची तक्रार नोंदवली, त्यावर ते काहीही बोलत नाही, पुढे ते म्हणतात काम चालू करा, त्यामुळे आमच्या तक्रारीला काहीही अर्थ नाहीये, त्या मतपेटीमध्ये कोणत्या उमेदवाराचं मत आहे, हे आम्हाला माहिती नाही, ते विरोधकांचं असेल आमचं असेल, पण तिथे ज्या ज्या उमेदवाराचे प्रतिनिधी आहेत, त्या सर्वांनीच यावरती आक्षेप घेतलेला आहे, पक्षीय, अपक्षीय सर्वांनी याबाबत आक्षेप नोंदवला आहे.
View this post on Instagram
आम्ही अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर अधिकारी तिथे आले, त्यांनी पाहिलं, त्यांनी कागद पाहिला, कागदाचं सील आहे, वरती असलेलं लाखेचं सील तुटलेलं आहे, तरीसुध्दा कागदाचं सील आहे म्हणत त्यांनी प्रोसिड म्हणजेच काम चालू करा असं सांगितलं, तिथे सात ते आठ पेट्या अशा निघाल्या त्याचे सील तुटलेलं आहे, ते मतदान कोणाला दिलेलं आहे, माहिती नाही, पण असं सील तुटणं ही गंभीर बाब आहे, निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेतली पाहिजे, असंही महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
दरम्यान, सील तुटलेल्या मतपेट्या बाजुला ठेवाव्यात आणि उर्वरीत मतपेट्यांची मोजणी करावी, आम्ही तिथे सर्व मोजू शकलो नाही, पंरतू सात ते आठ मतपेट्या त्या ठिकाणी सील तुटलेल्या आहेत, कमीत कमी सात ते आठ पेट्या आहेत, आम्ही चार पाच मिनीटं बोलतो, तिथं ऐकतात हो हो म्हणतात आणि पुढे मतमोजणी सुरू करतात, आम्ही महाविकास आघाडीचे प्रतिनिधी आहोत, त्यावरती आम्ही आक्षेप घेतला आहे, लेखी आक्षेप घेऊ देत नाहीत, बोलू देत नाहीत, आम्हाला सांगितलं जातंय कागद देतो,आम्हाला आधी कागद पेन आतमध्ये आणू दिला नव्हता, आता आम्ही आक्षेप घेतल्यानंतर आम्हाला त्यांनी कागद पेन दिला आहे, आम्ही आक्षेप घेणार, मतमोजणी थांबवा असं आमचं म्हणणं नाही, तर ज्या सील तुटलेल्या पेट्या आहेत त्या बाजुला ठेवा आणि पारदर्शकपणे मतमोजणी करा, असं महायुतीच्या प्रतिनिधींनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांचा कथित ऑडिओ क्लिपबाबत मोठा निर्णय…
राज ठाकरे यांच्याकडून अखेर ‘ती’ डॉक्युमेंटरी डिलीट, सांगितले खरे कारण…
One thought on “पुणे पदवीधरची मतमोजणी सुरु होताच उडाली एकच खळबळ…”