नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील आक्रमक नेते नितेश कराळे गुरुजी यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याने या लढतीत नवा ट्विस्ट आला. मात्र, मतदानाच्या एक दिवस आधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने मोठा निर्णय घेतला असून महाविकास आघाडीचे बंडखोर नितेश कराळे मास्तर यांची पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. हकालपट्टीचे वृत्त समजताच कराळे मास्तर प्रचंड भावूक झाले आणि त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला.
पक्षादेशाचे पालन केल्याने मतदानाच्या एक दिवस आधी नितेश कराळे यांची पक्षातून हाकालपट्टी केली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून नितेश कराळे यांची सहा वर्षासाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. यावर बोलताना कराळे गुरूजी म्हणाले, निवडणुकीच्या काळात मी पक्षासाठी राज्यभर प्रवास केला. स्वतःच्या क्लासकडे दुर्लक्ष करून मी राज्यभर सभा घेतल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे. मी पक्षाच्या निर्णयाचा स्वीकार केला, परंतु ही कारवाई पूर्णपणे चुकीची असल्याचे मत त्यांनी मांडले.
View this post on Instagram
सर्वसामान्यांसाठी लढा देताना आपल्यावर शंभरहून अधिक पोलीस केसेस दाखल झाल्या, दोन अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले आणि तुरुंगवासही भोगला. मात्र, या बिकट परिस्थितीत किंवा तुरुंगवास भोगत असताना पक्षातील कोणत्याही मोठ्या नेत्याने साधी विचारपूसही केली नाही, अशी खंत बोलताना त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. मी नेहमीच जनतेच्या आणि पक्षाच्या हितासाठी काम केलं, आता जनताच मतदानातून उत्तर देईल. या संपूर्ण कारवाईमागे काँग्रेस पक्षाचा दबाव असण्याची दाट शक्यता असल्याचे त्यंनी सांगितले. पक्षाचा निर्णय मी स्विकारतो निवडणूक झाल्यानंतर मी माझी भूमिका मांडणार असल्याचे कराळे गुरुजींनी सांगितले.
पक्षाने म्हटले आहे की, महाविकास आधाडीतील घटक पक्ष म्हणून आघाडीच्या अधिकृत उमेदवाराच्या विजयासाठी काम करणे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची ही नैतिक व राजकीय जबाबदारी आहे. परंतु, आपण पक्षाच्या धोरणांच्या व निर्णयांच्या विरोधात जाऊन नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आपण अशाप्रकारे पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्याबद्दल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तसेच वरिष्ठ नेतृत्वाच्या निर्देशानुसार, आपणास पक्षातून 6 वर्षाकरता आपली हकालपट्टी करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अभिजीत वंजारी यांना पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने याबाबत अधिकृत पत्राक जारी केले आहे.
चर्चांना उधाण! राष्ट्रवादीत मंत्रिमंडळ बदलाच्या जोरदार हालचाली सुरू…
राष्ट्रवादीच्या गोटातून महत्त्वाची बातमी समोर, तीन नेत्यांचा पत्ता कट…
अजितदादांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका; सुनेत्रा पवार आक्रमक…