मुंबईः मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा शिवसेनेच्या नेत्यांनी मंगळवारी मुंबईत पार पडलेल्या दसरा मेळाव्यात समाचार घेतला. शिंदे सेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका केली. मनोज जरांगे पाटील तू उपोषणाला बसल्यावर बाथरुममध्ये जाऊन गपचूप खातोस, सुपारी घेऊन एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करतोस. तुझी औकात काय आहे, असा सवालच रामदास कदम यांनी उपस्थित केला.
शिंदे साहेब माझी विनंती आहे, लावा त्याची चौकशी. तू कोणाची बदनामी करतोयस, कोणाची सुपारी घेऊन बोलतोयस? तुझी औकात काय आहे? मराठा समाजाने तुला त्यांना न्याय देण्यासाठी पाठिंबा दिला. त्याचा तू गैरफायदा घेतो काय? ज्या गावात मनोज जरांगे यांचं उपोषण सुरु होतं, त्या गाववल्यांनी त्याला हाकलून दिले आहे, अशी घणाघाती टीका रामदास कदम यांनी केली.
View this post on Instagram
एक गोष्ट मी आपणाला सांगतो, तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना उद्ध्वस्त करायला जाल तर तर हा मराठा समाज तुला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही, हे सांगायला इथे आलो आहे. अरे कोण आहेस तू कोण आहेस? हा मराठ्यांचा नेता झाल्यापासून याची संपत्ती कुठे आहे, कुणाकुणाच्या नावावर आहे, कुठल्या नातेवाईकांच्या नावावर आहे, लावा चौकशी याची. एकदा दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊ द्या, असे रामदास कदम यांनी म्हटले आहे.
एक मराठा समाजाचा माणूस महाराष्ट्र ढवळून काढतोय, मराठा समाजाला न्याय देतोय, दहा टक्के आरक्षण मराठ्यांना एकनाथ शिंदेंनी दिले. बेईमान माणसा तू कोणावर बोलतोय, याद राख. एकनाथ शिंदे साहेबांवर बोलशील, 500 कोटींचा आरोप करतोस, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. तू कोणाला बदनाम करतोस, कोणाची सुपारी घेऊन? एकनाथ शिंदे आमचं दैवत आहे. शिवसैनिकांचं दैवत आहे, मराठा समाजाचं दैवत आहे. त्यांच्याबाबत बोलशील तर महाराष्ट्र खपवून घेणार नाही, मराठा समाज खपवून घेणार नाही. अरे जरांग्या तुला माहिती आहे का मराठा समाजाचा पहिला मेळावा संभाजीनगरला कुणी काढला होता, तेव्हा कुठे झोपला होतास, अशी टीका रामदास कदम यांनी केली.
पंतप्रधान, मुख्यमंत्री, एकनाथ शिंदेंना एकेरी बोलणार अरे तू आहेस कोण? जगाचा मालक आहेस? ही मराठा समाजाची संस्कृती आहे का? समाजानं तुला समाजाला न्याय देण्यासाठी पाठिंबा दिला, त्याचा गैरफायदा घेतो का तू, ज्या गावात उपोषण होतं, त्या गावानं त्याला हाकून दिला आहे. शिंदे, कदम, भोसले हे मराठा आहेत, लाचार नाहीत तुझ्यासारखे. याद राख एकनाथ शिंदे दोन दोन हातानं देणारे आहेत, घेणारे नाहीत. सुपारी घेऊन त्यांना बदनाम करायला निघालास का? यापुढे गाठ मराठा समाजाशी आहे, शिवसैनिकांशी गाठ आहे हे सांगायला इथं आलो आहे, असेही रामदास कदम यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे यांना आणखी एक झटका, चौकशीचा फास आणखी आवळला…
मराठ्यांचा मराठ्यांशी संघर्ष झाल्यास एकनाथ शिंदेच जबाबदारः मनोज जरांगे यांचा परखड इशारा