महाराष्ट्रात दुष्काळ अन् 4 कोटींची लँड क्रुझर, 32 इनोव्हांसह 44 महागड्या गाड्यांच्या खरेदीचा निर्णय…

mantralaya
Share

मुंबई : दुष्काळाच्या तोंडावर महाराष्ट्र सरकारकारने व्हीआयपी अतिथींसाठी नव्या महागड्या गाड्यांची खरेदी करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. तब्बल 12.68 कोटी रुपयांच्या 44 गाड्या खरेदीसाठी मंजुरी देण्यात आली आहे. यात सगळ्यात महागडी गाडी चार कोटी रुपयांची आहे. या निर्णयामुळे राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना राज्य सरकारची वाहन खरेदी थांबत नसल्याचं पाहायला मिळत आहे. तब्बल 12 कोटी 68 लाख रुपयांच्या 44 वाहनांची खरेदीला मंजूरी दिली आहे. यात व्हीआयपी पाहुण्यांसाठी तब्बल चार कोटींची एक लँड क्रूजरची खरेदी करण्यात येणार आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये खर्च वाचवा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे असतानाही वाहन खरेदी केल्याने मोठी टीका होत आहे. दौऱ्यावर आलेल्या व्हीव्हीआयपी पाहुण्यांसाठी ही वाहन खरेदी करण्यात आली आहे. दरम्यान, या निर्णयानंतर आता विरोधक सरकारवर टीका करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

कोणते वाहन किती रुपयांना खरेदी…
1) टोयोटा इनोव्हा क्रिस्टा (डिफेन्स/डिझेल): 32 वाहने (प्रत्येकी किंमत अंदाजे 20.71 लाख रुपये).
2) टोयोटा फॉर्च्युनर (डिझेल – 4×2 Manual): 2 वाहने (प्रत्येकी किंमत 30 लाख रुपये).
3) टोयोटा लँड क्रुझर 300 (NIJ III/B6 लेव्हल प्रोटेक्शनसह बुलेटप्रूफ वाहन): 1 विशेष बुलेटप्रूफ वाहन (किंमत 4 कोटी 7 लाख 68 हजार रुपये).
4) मारुती सुझुकी एर्टिगा (पेट्रोल): 7 वाहने (प्रत्येकी किंमत 11.59 लाख रुपये).
5) टोईंग वाहन (TATA 207 YADHA): 1 वाहन (किंमत 9 लाख रुपये).
६) अर्बानिया बस (16+D): 1 बस (किंमत 31 लाख रुपये).

दरम्यान, सरकारनं राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. अशातच आता राज्या सरकारने व्हीआयपी अतिथींसाठी नव्या गाड्यांची खरेदी करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. तब्बल 12.68 कोटी रुपयांच्या 44 गाड्या खरेदीसाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता सरकारच्या या निर्णयावरुन वातावरण तापण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे. विरोधक सरकारवर टीका करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दुष्काळावर मात करण्यासाठी आठ महिन्यांचे नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांच्या यादीत आणखी १९ तालुक्यांचा समावेश – कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती

विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेण्याच्या राज्य मंडळाच्या सूचना; दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना दिलासा

राज्यात दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना काय काय मिळणार? राज्य सरकारकडून यादीच जाहीर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!