पंतप्रधान मोदींच्या बारामती दौऱ्याची तारीख बदलली; शरद पवारांनी सांगितलं..

Share

बारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बारामती दौरा अखेर निश्चित झाला आहे. मोदी 24 ऑक्टोबरला बारामतीला येणार होते. पंरतु आज समोर आलेल्या माहितीनुसार, 3 नोव्हेंबरला रोजी पंतप्रधान मोदी विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात उभारण्यात आलेल्या ‘प्रेरणास्थळा’चे उद्घाटन करणार आहेत. याशिवाय विद्या प्रतिष्ठानमध्ये उभारण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) संस्थेची पाहणी आणि त्याबाबतचे सादरीकरणही पंतप्रधानांसमोर होण्याची शक्यता आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (शनिवारी, ता 3) माध्यमांना माहिती दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा कसा असणार आहे, याची माहिती देखील शरद पवार यांनी दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बारामतीत यावं अशी विनंती केली होती. तो कार्यक्रम पुढं ढकलला आहे. काल प्रधानमंत्री यांच्या कार्यालयाने आपल्याला पाठवले आहे. 3 नोव्हेंबरला मोदी बारामतीत येतील. 10 वाजता सकाळी विमानतळवरती येतील. त्यानंतर विद्या प्रतिष्ठान येथे येतील, अशी माहिती शरद पवारांनी दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

प्रेरणास्थळ येथे गौतम बुद्ध यांचा पुतळा बसवलेला आहे. त्याचे वजन 4 टन आहे. बुद्धाची हस्त मुद्रा आहे, हस्तमुद्रा याचा अर्थ काय आहे, याची माहिती तिथं दिली आहे. त्याच्याच बाहेरच्या राउंड आहे. ज्यांनी महाराष्ट्रामध्ये चांगलं काम केलं, त्यांचे पेंटिंग आहेत. अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, सयाजीराव गायकवाड, राजर्षी शाहू महाराज, महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, आण्णाभाऊ साठे, यशवंतराव चव्हाण, शरदबाई पवार यांचे पेंटिंग आहे. त्याची उंची 5.9 आहे, अशी माहिती देखील शरद पवार यांनी दिली आहे.

पंतप्रधान मोदी यांच्यासह अन्य लोकांना निमंत्रण दिले आहे. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार तसेच काही महत्त्वाच्या कंपन्या, मायक्रोसॉफ्टचे प्रमुख, सुप्रिया सुळे, पार्थ पवार, सिरमचे प्रमुख सायरस पुनावाला, बाबा कल्याणी, विजय शिर्के, अनिल काकोडकर यांना निमंत्रण दिले आहे. 10 वाजता विद्या प्रतिष्ठानमध्ये येतील.

गौतम बुद्ध यांचा पुतळा आहे, तिथे सर्वजण येतील. पेंटिंग पाहतील. कृत्रिम बुद्धिमत्त याबाबत काम करणारे विद्यार्थी तिथं असतील, हे सगळ्यांना भेटतील. त्यांच्याशी बोलतील. मुलांनी स्टार्टअप केलं आहे, त्या मुलांना भेटतील. यानंतर सगळे नेते मैदानात येतील, तिथं 11:45 मिनिटांनी कार्यक्रम सुरू होईल. संस्थेचे उपाध्यक्ष प्रभूणे बोलतील, त्यानंतर माझं बोलणं होईल, मुख्यमंत्री बोलतील, प्रधानमंत्री बोलतील.प्रधानमंत्री कार्यालयात विनंती केली आहे की, दोन्ही उपमुख्यमंत्री बोलण्यासाठी जर त्यांच्याकडून कार्यक्रम बदल आला तर उपमुख्यमंत्री भाषण करतील, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे, सुप्रिया सुळे अशी नावं आहेत, 12:10 मिनिटांनी प्रधानमंत्री त्यांच्या कार्यक्रमाला जातील, अशी संपूर्ण माहिती शरद पवार यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!