पुण्यातील MPSC आंदोलनाला यश, चौकशी आयोगात कोण कोण? अन् विवेक भीमनवार यांची प्रतिक्रिया…

vivek-bhimanwar
Share

पुणे: पुण्यात आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही दिवसांपासून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. अखेर या आंदोलनाला यश मिळाले आहे. राज्य सरकारमधील मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आंदोलनस्थळी भेट दिली अन् शासनाची बाजू मांडली. दोन्ही बाजूंनी चर्चा झाल्यानंतर एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या समाविष्ट असलेल्या चौकशी समितीकडून पेपरफुटी प्रकरणाची चौकशी होईपर्यंत विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर असतील. यानंतर आता विवेक भीमनवार यांनी ट्विट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

विवेक भीमनवार म्हणाले, ‘एमपीएससी पेपरफूट प्रकरणात राज्य सरकारने न्यायालयीन चौकशीची घोषणा केली आहे. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात नैतिकतेला कायम प्राधान्य दिले. त्यामुळे ही चौकशी पूर्ण होईस्तोवर पदावर कार्यरत न राहता या कालावधीत रजेवर जाण्याचा निर्णय मी घेतला आहे. एमपीएससीची स्वायत्तता, विश्वसनीयता आणि विद्यार्थीहिताला कायम माझं प्राधान्य होतं आणि यापुढेही असेल.’

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

चौकशी आयोगात कोण कोण…
दिलीप भोसले (माजी मुख्य न्यायाधीश) – अध्यक्ष
पी. डी. नाईक (माजी न्यायाधीश) – सदस्य
तुकाराम मुंढे (आयएएस, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन) – सचिव
गणेश पाटील (आयएएस, सेवानिवृत्त सचिव) – सदस्य
लक्ष्मी गौतम (आयपीएस, पोलीस महानिरीक्षक – कायदा व सुव्यवस्था) – सदस्य

दरम्यान, पेपरफुटी प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारकडून समितीची स्थापना आली अन् तुकाराम मुंढे यांचा समावेश या समितीमध्ये सचिव म्हणून केला गेला आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असतानाच राज्य सरकारचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मोठी घोषणा केली आहे. तुकाराम मुंढे हे एमपीएससीच्या चौकशी आयोगाचे सचिव म्हणून काम करतील, असे शिवेंद्रराजे भोसले म्हणाले आहेत.

प्रकृती खालावल्यामुळे एमपीएससी आंदोलकांपैकी तिघांजणांचे उपोषण मागे

Video! सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, जेनझी रस्त्यावर अन् अनेकांची धरपकड…

…म्हणून एमपीएससी आंदोलन पुण्यातून मुंबईत हलवण्याची तयारी? मुंबईत कुठे जमणार हजारो विद्यार्थी?

One thought on “पुण्यातील MPSC आंदोलनाला यश, चौकशी आयोगात कोण कोण? अन् विवेक भीमनवार यांची प्रतिक्रिया…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!