उझ्बेकिस्तानात पाकिस्तानी नागरिकाने केली ‘हिंदुस्तान झिंदाबाद’ची घोषणा

Share

ताश्कंदः उझ्बेकिस्तानातील या राजधानीत भारतीय आणि पाकिस्तानी व्यक्तींमधील संभाषणाला ‘गदर चित्रपटाची उलटी आवृत्ती’ असेही म्हणता येईल. ज्याप्रमाणे गदर चित्रपटात अमरीश पुरी यांचे पात्र सनी देओलला ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची घोषणा द्यायला सांगते, त्याचप्रमाणे आलोक जयस्वाल नावाच्या एका इन्फ्लुएन्सरने उझ्बेकिस्तानमध्ये एका पाकिस्तानी व्यक्तीकडून ‘हिंदुस्तान जिंदाबाद’ची घोषणा करवून घेतली आहे. या व्हिडिओवर आता सर्वत्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

डॉ. आलोक जयस्वाल हे एक भारतीय व्लॉगर आहेत जे जगभर प्रवास करतात. सध्या ते त्यांचा मित्र सामीसोबत उझ्बेकिस्तानमध्ये आहेत. एका पार्कमधून चालत असताना, काही पाकिस्तानी माणसे ‘हे!’ असे म्हणत जवळून जातात. हे ऐकून आलोक त्यांना विचारतो की ते कुठून आले आहेत. पाकिस्तान, असे ऐकल्यावर ते त्याला ‘हिंदुस्तान झिंदाबाद’ म्हणायला सांगतात.

तो पाकिस्तानी आहे हे समजल्यानंतर, जयस्वाल यांनी त्याला आपला शेजारी म्हटले आणि म्हणाला, ‘भाऊ, हिंदुस्तान झिंदाबाद’ म्हण’. प्रत्युत्तरादाखल त्याने पाकिस्तानी नागरिकाने तशी घोषणा केली आणि त्या बदल्यात, त्याने जयस्वाल यांना ‘पाकिस्तान झिंदाबाद’ म्हणायला सांगितले. जयस्वाल यांनी त्याची इच्छाही पूर्ण केली. त्या पाकिस्तानी नागरिकासोबत असलेल्या महिलेने विचारले, तेव्हा जयस्वाल यांनी आपण दिल्लीचे असल्याचे सांगितले.

जेव्हा पाकिस्तानी नागरिक जयस्वाल यांना त्यांचे युट्यूब चॅनलबद्दल विचारतात, तेव्हा आपण खूप प्रसिद्ध आहोत, असे जयस्वाल सांगतात. ते निघून जात असताना, पाकिस्तानी नागरिक ‘पाकिस्तान जिंदाबाद’, ‘हिंदुस्तान जिंदाबाद’, अशी घोषणा देतो. सर्व जण निघून गेल्यावर, आपण पहिल्यांदाच इतक्या चांगल्या पाकिस्तानी नागरिकाला भेटलो, असे सांगतात.

पाकिस्तानी आणि भारतीयाचे संभाषण ऐकल्यानंतर, परदेशस्थ भारतीय म्हणतात. की परदेशात हे सामान्य आहे. जेव्हा या दोन देशांतील लोक भेटतात, तेव्हा ते मोकळेपणाने वागतात. कॉमेंटमध्ये एकाने टिप्पणी केली आहे, की आपापल्या देशात राहत असताना त्यांच्यात अनेकदा मतभेद होतात, पण परदेशात गेल्यावर त्यांच्यातील शत्रुत्व उरत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!