विद्यानंद बापट यांची भाषा बदलली; शेण, गोमूत्र खाणारे देवभोळे तुम्ही…

vidyanand-bapat
Share

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदा डीजे व लाऊडस्पीकरच्या आवाजाला विरोध करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर गणेश मंडळांनी साधलेला अनोखा डिजिटल आणि कलात्मक ‘निशाणा’ संपूर्ण मिरवणुकीत विशेष चर्चेचा विषय ठरला आहे.

डीजेविरोधात सातत्याने आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्याविरोधात झळकलेले बॅनर, एलइडी स्क्रीनवरील फोटो आणि देखावे यांमुळे यंदाची मिरवणूक चर्चेत आली. सर्व बॅनरवरती आणि डीजेच्या आवाजावरती विद्यानंद बापट यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

यावेळीच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत आणखी एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली, ती म्हणजे तुमच्या नावाचे बोर्ड अनेक मंडळं घेऊन जाताना दिसले. काही याच्यामध्ये तुमची टर उडवली, खिल्ली उडवली. “बघा, तुम्ही विरोध कितीही केला तरी आम्ही शेवटी डीजे आणलाच”. याच्याकडे कसं बघता? यावरती उत्तर देताना विद्यानंद बापट म्हणाले, ‘ते तुम्हा नागरिकांना त्रास देत आहेत. म्हणजे माझं वैयक्तिक काही याच्यामध्ये हे म्हणणं वगैरे त्याच्यात नाहीये. की मला समजा फ्लॉवरचे पोहे आवडतात आणि मी कुठेतरी शोधत फिरतोय, जे की पुण्यात मिळणं महामुश्किल आहे. वगैरे… तर तशी माझी वैयक्तिक आवडीनिवडीची बाब नव्हे आहे. आणि तुम्हाला जी मिजास आहे ती कसली आहे? शेण खाऊन तुम्ही गोमूत्राच्या नशेत जे बेधुंद होताय, जनावरांचे मलमूत्र खाणारे हे देवभोळे, धर्मभोळे उत्सवकार, त्यांना मिजास कसली असते? परवानगीची. आता जनावरांचं मलमूत्र खातात कारण परवानगी आहे. खाल्लं खरोखर तर सारासार विवेकबुद्धीने श्रीखंड पाहिजे. परवानगी आहे आता, आम्ही नाही ते खात जनावरांचं मलमूत्र, कुठलंच मलमूत्र खात नाही. पण ते खातात, मिटक्या मारीत ते खातात जनावरांचं… म्हणजे विष्ठा खातात आणि ते गोमूत्र पितात. का खातात? कारण परवानगी आहे. आता ठीक आहे, त्यांचं ते व्यक्तीस्वातंत्र्य मानलं. पण नागरिकांना… आजूबाजूच्या त्रास होईल अशा गोष्टी ज्या तुम्ही करताय, ध्वनिप्रदूषण आणि रहदारी… ते कशाच्या जीवावर करताय? कसल्या उड्या मारतायत? तर तुम्हाला परवानगी दिली, त्याची मिजास आहे. १२ वाजता बरोबर उतरते ती रात्री. बरोबर १२ ते ६ बरोबर उतरते. कोरोना काळात सर्व दिवस उतरलेली होती ती मिजास. तर ही परवानगीची मिजास त्यांना आहे, ती आम्हाला मोडून काढायची आहे. बाकी काय शेण खा, कितीही गोमूत्र प्या, ते खाऊ शकतात. तर त्यामुळे… त्यांच्याकडून त्यापलीकडे काही अपेक्षाच नाही, की ते देवभोळे, धर्मभोळे, शेण खाणारे आणि गोमूत्र पिणारे. तर त्यांची परवानगीची मिजास मात्र आम्ही नक्की उतरवू, असेही बापट यांनी म्हटले आहे.

दरम्यान, बापट यांची भाषा बदलली का? कारण याच्या आधी बापट अतिशय सौम्य भाषेत बोललेले पाहिले. आता मात्र तुम्ही त्यांना ते मिजासखोर, शेण खाणारे, मलमूत्र अशा प्रकारचे शब्द वापरताय. त्यामुळे बापटांच्या मनासारखं नाही झालं, त्यामुळे बापट यांना संताप होत आहे. काय नक्की काय होतंय? भाषा का बदलली बापटांची? या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, अहो नाही, मी फक्त वस्तुस्थितीचं वर्णन करतोय. खरोखरच ते शेण खातात वेड्यासारखं. म्हणजे त्याचे AI जनरेटेड नाही, वास्तवातले व्हिडिओ बघून आमचं मनोरंजन होतं, की शेण खातायत, गोमूत्र पितायत. म्हणजे मुळात विष्ठा खातायत. जी माणसाची पण आपण खात नाही, स्वतःची पण खाणार नाही आणि ते जनावरांचं खातायत. तर इतकं हास्यास्पद वाटतंय आणि ते वास्तविक व्हिडिओ असतात, तर ते AI जनरेटेड काहीतरी डीपफेक बावळटासारखे व्हिडिओ बनवून दाखवतात जे सध्याच्या काळात सहज शक्य आहे. पंतप्रधानांचे बनवलेत. तर त्याच्यात मला तर खरोखर दखल घेण्याजोगी ही गोष्ट वाटत नाही. तर इतके हास्यास्पद बावळटासारखे माकडचाळे ते करतात, जनावरांचं मलमूत्र खाण्याचे. तर ते भयंकर किळसवाणे असतात आणि ते का वेड्यासारखे ते करतात. तर त्यांच्याकडून फक्त आमची अपेक्षा एवढीच आहे की तो बावळटपणा त्यांचा त्यांच्यापाशी, पण नागरिकांना त्रास त्यांनी देऊ नये. ध्वनिप्रदूषण आणि रहदारीस अडथळा करू नये, म्हणजे मग नागरिकांना त्याबद्दल बोलायचं काही कारण राहणार नाही ना. तर तो बावळटपणा त्यांनी करणं टाळावं, असेही पुढे विद्यानंद बापट यांनी एका मराठी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

गणेशोत्सवानंतर काय! विद्यानंद बापट यांचा पुढचा मोठा प्लॅन तयार; राजकारणात…

पुणे शहरात विद्यानंद बापट यांना मारहाण झाल्यानंतर शरद पवार म्हणाले…

‘डीजे’चे स्तोम संपलेले दिसेल; ‘कायद्याचा बडगा नको; लोकांना विश्वासात घ्यायला हवे’; मुख्यमंत्र्यांचा दावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!