ठाकरे बंधूंचा निवडणूक आयोगाविरुद्ध एल्गार; भव्य मोर्चा काढणार, तारीखही ठरली…

thackeray-brother
Share

मुंबई : निवडणूक आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवर दोन आयुक्तांनी घेतलेल्या १४ आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर तसेच ‘एसआयआर’ च्या माध्यमातून कोट्यवधी मतदारांची नावे गायब झाल्याच्या मुद्द्यावरून मुंबईत मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या ४ ऑक्टोबरला एकत्रित भव्य मोर्चा काढणार आहेत.

संबंधित मोर्चा एका पक्षापुरता न राहता तो तमाम राजकीय व्यवस्थेचा आणि जनतेचा आवाज ठरेल यासाठी सर्व राजकीय पक्षांना या मोर्चा मध्ये सहभागी होण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. हिंदीसक्तीच्या मुद्द्यावर राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांनी विराट मोर्चा काढला होता. त्यानंतर आता निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधू यांनी एल्गार पुकारला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

देशातील सत्ताधारी पक्षाची जणू काही आपण शाखाच आहोत अशा पद्धतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाने ‘एसआयआर’च्या नावाखाली मतदारांची जी घोर फसवणूक केली आहे, त्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना येत्या ४ ऑक्टोबर २०२६ ला मुंबईत एक जनमोर्चा काढणार आहे. या मोर्चाच्या आयोजनात जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा पुढाकार असला तरी हा जनतेचा मोर्चा आहे आणि हा एका पक्षापुरता न राहता तो तमाम राजकीय व्यवस्थेचा आणि जनतेचा आवाज ठरेल यासाठी आम्ही सर्व राजकीय पक्षांना या मोर्चा मध्ये सहभागी होण्यासाठी संवाद साधणार आहोत.

अर्थात महाराष्ट्रातील जनतेलाच आवाहन आहे की, आपण मोठ्या संख्येने या मोर्च्यात सहभागी व्हा. बाकी मोर्च्याची वेळ आणि ठिकाण लवकरच कळवण्यात येईल. तेंव्हा एसआयआरविरोधातील या जन मोर्च्यात भेटूया, देशातील लोकशाही आणि या देशाचे संविधान वाचवण्यासाठी एकत्र या, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.

ज्ञानेश कुमार यांच्या हुकूमशाहीविरुद्ध निवडणूक आयोगातच बंड; संजय राऊत यांचा दावा

पुढच्या निवडणुका EVM वर नको, बॅलेट पेपरवर घ्या : राज ठाकरे

मतं चोरणाऱ्यांना आज ना उद्या शिक्षा करणारच : राहुल गांधी

एसआयआर प्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात काँग्रेस आणणार महाभियोगाचा प्रस्ताव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!