Digital India! UPI पेमेंट महाग करण्याच्या निर्णयावर रोहिणी खडसे म्हणाल्या…

rohini-khadse
Share

जळगाव : UPI व्यवहार शुल्कासंदर्भात सरकारने मोठा निर्णय घेतला असून, 2 हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या UPI पेमेंटवर व्यापाऱ्यांना 0.4 टक्के शुल्क भरावे लागणार आहे. परिणामी आता UPI व्यवहार यापुढे विनामूल्य राहणार नाहीत. सरकारच्या या निर्णयावरती आता विरोधकांनी टीका केली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी सोशल मिडीया पोस्ट करत टीका केली आहे.

NPCI कडून UPI शुल्काबाबत नवी नियमावली जाहीर केली आहे. यात दोन व्यक्तींमधील (P2P) सर्व यूपीआय व्यवहार शुल्करहित राहतील मात्र २,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यापारी व्यवहारांवर ०.४ टक्के एमडीआर लागू होईल, ज्याची कमाल मर्यादा (Cap) ३०० रुपये निश्चित करण्यात आली आहे. यावरूनच रोहिणी खडसे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावरून याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्या म्हणाल्या की, शेतकरी खतं, बियाणं, औषधं किंवा शेतीसाठी लागणारं साहित्य खरेदी करतो; सामान्य कुटुंब महिन्याचं किराणा सामान घेतं; छोटा दुकानदार आपला व्यवसाय चालवतो आज प्रत्येक ठिकाणी UPI हा रोख पैशाला पर्याय बनला आहे. ‘डिजिटल इंडिया’ म्हणत सरकारने लोकांना UPIची सवय लावली आता त्यावर ज्यादाचे पैसे आकारले जाणार आहेत‌. हा तर सरकारचा यु-टर्न आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

शायरीतून टीका करत पुढे रोहिणी खडसे यांनी म्हटलंय की, एकीकडे ‘डिजिटल इंडिया’चा ढोल बडवायचा आणि दुसरीकडे डिजिटल व्यवहारांचा खर्च वाढवायचा. आता लोक यांना नक्की म्हणतील…सोचता थे की वो कितने मासूम है..क्या से क्या हो गये देखते देखते!.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (NPCI) नवीन फ्रेमवर्कनुसार, 2,000 पेक्षा जास्त रकमेच्या मर्चंट पेमेंट्सवर (P2M) 0.4% मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) आकारला जाईल. हा नवीन नियम 15 ऑक्टोबर 2026 पासून लागू होईल. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की हे शुल्क प्रति व्यवहार 300 पर्यंत मर्यादित असेल. याचा अर्थ असा की, 75,000 किंवा त्याहून अधिक रकमेच्या पेमेंटसाठी देखील, UPI MDR जास्तीत जास्त 300 रुपये इतकाच आकारला जाईल. तर दुसरीकडे मोठ्या रकमेच्या UPI व्यवहारांवर MDR लागू करण्याच्या निर्णयाचे आरबीआयकडून समर्थन करण्यात आले आहे.₹2,000 पेक्षा जास्त UPI व्यवहारांवर MDR लागू होणे महत्त्वाचे पाऊल असल्याचे आरबीआयचे म्हणणे आहे. या निर्णयामुळे भारतातील डिजिटल पेमेंट व्यवस्थेची दीर्घकालीन शाश्वतता मजबूत करण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.

मोठ्या राजकीय पदाधिकाऱ्याने केला विधवा महिलेवर लैंगिक अत्याचार : एकनाथ खडसे

एकच खळबळ! एकनाथ खडसेंच्या घरातून ‘ती’ सीडी अन् पेनड्राईव्ह गायब…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!