उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी दिला काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा; का उचचले टोकाचे पाऊल?

Share

देहराडून: उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी काँग्रेस पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी (ईडी) हरीश रावत यांचे माजी स्वीय सचिव चंदन सिंग जिना यांच्या निवासस्थानावर छापा घातल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. काल रात्री उशिरा, हरीश रावत यांनी इंटरनेटवरील एका पोस्टद्वारे आपल्या संघटनात्मक पदांचा राजीनामा दिल्याची घोषणा केली आहे.

राज्यात येत्या काही महिन्यांनंतर विधानसभेच्या निवडणुका होणार असून, काँग्रेसमधील बड्या चेहऱ्यांनी आणि पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आपली संघटनात्मक पदे सोडल्याने उत्तराखंडमधील राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हरीश रावत यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, दूरचित्रवाणीवरील बातम्यांनुसार हरीश रावत यांच्या सचिवाच्या निवासावरील छाप्यात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत. जिना हे एक अतिशय सौम्य, नम्र आणि मेहनती व्यक्ती आहे. ग्रामसेवकांच्या भरतीदरम्यान त्याने ओएमआर शीटमध्ये फेरफार करून अशा काही चुका केल्याचा पुरावा असेल, तर त्याच्या या कृत्याची आपल्याला लाज वाटते. तथापि, या आरोपांवर आपला अजिबात विश्वास नाही.

काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस कार्यकर्ते भ्रष्टाचाराविरोधातील लढ्यात एकजूट आहेत. राहुल गांधी ‘स्कूल्स एकोज’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवित आहेत. अशा वेळी, हरीश रावत यांच्या कोणत्याही कृतीमुळे पक्षाचा लढा कमकुवत व्हावा, असे आपल्याला मुळीच वाटणार नाही. त्यामुळे, आपण हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!