सोलापूर : सोलापूरमध्ये माजी नगरसेवक लालचंद वाधवानी यांच्यावर भरदिवसा धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या घटनेनंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. लालचंद वाधवानी हे सिंधी समाजाचे अध्यक्ष तसेच माजी नगरसेवक होते. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ देखील समोर आला आहे.
हल्ला करणारा संबंधित मारेकरी हा हातात धारदार शस्त्र घेऊन त्याने सर्वांसमोर वाधवाणी यांच्यावर वार केला. हल्ला केल्यानंतर तो तिथंच थांबला नाही तर त्याने तिथून लगेच पळ काढला. संबंधित घटना त्या परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेनंतर जखमी वाधवानी यांच्यावर सोलापुरातील आसरा चौक परिसरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हल्ला करणारा वयोवृद्ध असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. हल्ला करणाऱ्याने हळूच येत 50 ते 60 लोकांसमोर माजी नगरसेवकावर कोयत्याने हल्ला केला. त्यानंतर तिथून तो आपल्या गाडीवर निघून गेला. हल्ला केल्यानंतर निघून जाताना त्याची गाडी देखील चालू होत नव्हती. त्यानंतर त्याने गाडी ढकलत ढकलत नेली. काही पूर्ववैमन्स्यातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान, विजापूर नाका पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिस सध्या फरार मारेकऱ्याचा शोध घेत आहेत.
नागपुरात भाजप नगरसेविकेच्या पतीवर मित्रानेच केला सशस्त्र हल्ला…
पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला…
मोठी बातमी! इम्तियाज जलील यांच्या कारवर हल्ला अन् मारण्याचा प्रयत्न…