नागपूर: भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी शिमले यांचे पती नितीन शिमले यांच्यावर रविवारी रात्रीच्या सुमारास सशस्त्र हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात नितीन शिमले गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र या घटनेनं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
कोतवाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन शिमले आणि आरोपी सोनू ठाकरे उर्फ पैलवान यांच्यात पैशाच्या व्यवहारावरून वाद होते. यावरून सोनू पैलवानने रविवारी रात्री जुनी शुक्रवारी चौकात नितीन शिमले याच्यावर चाकुने हल्ला केला. या हल्ल्यात शिमले गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिस लगेच घटनास्थळावर पोहोचले. त्यांनी जखमी नितीन यांना रुग्णालयात दाखल केले. मारेकरी सोनू ठाकरे हा घटनास्थळावरून फरार झाला असून सध्या पोलिस सोनू पैलवानचा शोध घेत आहे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
भाजप नगरसेविका मानसी सिमले यांचे पती निखिल श्याम सिमले यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. एकेकाळी मित्र असलेल्यानेच त्यांच्यावर हल्ला केला आहे. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, जखमी निखिल सिमले आणि आरोपी महेश ठाकरे हे दोघेही एका गाजलेल्या हत्याकांडात सहआरोपी होते. त्या गुन्ह्यातून दोघांचीही निर्दोष सुटका झाली होती. एकेकाळी सोबत असलेल्या या मित्रांमध्ये नक्की कोणत्या कारणावरून वितुष्ट आले आणि त्याचे पर्यावसान खुनाच्या प्रयत्नात कसे झाले, याचा तपास आता पोलिस करत आहेत. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात आणि नागपूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.