आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा…

sanjay-raut
Share

नवी दिल्ली: राजधानी नवी दिल्लीत जंतरमंतर विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी दिल्ली पोलिसांनी केलेल्या अत्याचारानंतर विरोधकांनी पीएम मोदी आणि केंद्रीय गृहमंत्र्यांवर हल्लाबोल सुरुच ठेवला आहे. विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण झाल्यापासून मोदी आणि अमित शाह संसदेत आले नसल्याने आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हल्ला चढवला आहे. आओ ना, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा,राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील, अशा शब्दात संजय राऊत यांनी पीएम मोदी यांनी आणि अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, ‘आओ ना.. डरो मत.. तुम्ही 56 इंचवाले आहात माहित आहे. एकवेळा संसदेत येऊन तरी बघा. डरो मत, राहुल गांधी चांगले संस्कारी आहेत, ते तुम्हाला काहीच होऊ देणार नाहीत, फक्त संसदेत थोडी धुलाई करतील. इतका हक्क नक्कीच आहे. राहुल संसदेच्या दारावरा उभे आहात, चोरून बघू नका, आओ भाई..आईए

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949

Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

‘अमित शाह जवाब दो’
दुसरीकडे, संसद परिसरात विरोधी पक्षाच्या खासदारांनी सरकारविरोधात आंदोलन केले. काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी आणि इतर विरोधी खासदारांनी ‘अमित शाह जवाब दो’ असे लिहिलेले फलक हातात घेतले होते आणि शाह यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. २० जुलै रोजी विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत निवेदन द्यावे, अशी विरोधी पक्षांची मागणी आहे. जोपर्यंत गृहमंत्री संसदेत निवेदन देत नाहीत, तोपर्यंत हा तिढा कायम राहील, असे प्रियांका म्हणाल्या. सभागृहाच्या आतही विरोधी पक्षांचा गदारोळ सुरूच होता. परिणामी, सकाळी 11 वाजता सुरू झालेले लोकसभेचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. या गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज केवळ अर्धा तास चालले. आज लोकसभेत सरकार चार विधेयके सादर करण्याची शक्यता आहे.

सरकार प्रश्नांपासून पळ काढत आहे, ते उत्तर का देत नाही?
सपा खासदार अखिलेश यादव यांनी विद्यार्थी आंदोलकांवरील पोलीस कारवाई, राम मंदिरातील प्रसादाची चोरी, महिला आरक्षण, मतदारसंघ पुनर्रचना आणि एफसीआरए विधेयक यांसारख्या मुद्द्यांवरून सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, “आम्ही सरकारला विचारतो की लाठीचार्ज का केला गेला, अश्रुधुराच्या नळकांड्या का फेकल्या गेल्या आणि विजेचे धक्के का दिले गेले. सरकार उत्तर का देत नाही? ते प्रश्नांपासून का पळ काढत आहे?”

मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी…

फडणवीस सरकारचा Gen Z साठी डॅमेज कंट्रोल प्लॅन तयार; पाहा प्लॅन…

दिल्लीतून डरकाळी! मुंबई पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया थेट राहुल गांधींसोबत…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *