पुणे: माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काका बाळासाहेब फडणवीस यांनी केले असून, या विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे. पत्रकार संतोष गाजरे यांनी लिहिलेल्या व ईश्वरी प्रकाशनने प्रकाशित केलेल्या ‘देवाभाऊ’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, महाराष्ट्र बँकेचे संचालक प्रसेनजित फडणवीस, व्याख्याते विशाल गरड, प्रकाशक संतोष धायबर, संदीप कद्रे उपस्थित होते.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!
बाळासाहेब फडणवीस म्हणाले, ‘माझा पुतण्या लॉ मध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे. त्याच्याकडे उत्कृष्ट वक्तृत्व होतेच, त्यामुळे तो राजकारणात येईल असे मला वाटले होते. नागपूरमधील एका प्रसिद्ध वकिलांकडे तो काम करत होता आणि त्यानंतर तो जनसंघात गेला. माझा पुतण्या कधी घरात राजकारण करत नाही. तेव्हा तो मोकळा असतो. माझा हा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल असं मला वाटतं आहे. त्याने एखादी गोष्ट मनावर घेतली की तो पूर्ण करत असे, कुठेही थांबत नसे. एकदा ठरलं तर ठरलं. त्याचा अभ्यास तो म्हणजे खरोखर अलौकिक आहे. तो लॉ कॉलेजमध्ये असताना तो आणि त्याचा मित्र दोघेही वादविवादपटू होते. नागपूरमध्ये महाविद्यालयांमध्ये वादविवाद स्पर्धा व्हायच्या, त्यामध्ये हे दोघे असले की समजायचं, पारितोषिक यांनाच मिळणार. वयाच्या 21 व्या वर्षी हा नगरसेवक झाला, 27 व्या वर्षी महापौर झाला आणि 31 व्या वर्षी आमदारकीची उडी मारली. आमदारकीची निवडून जिंकताना तुम्ही बघाल तर त्याने ज्यांचा दबदबा होता अशा राजकारण्यांचा पराभव केला. त्यावेळी काँग्रेसची मोठी ताकद होती. अशा स्थितीत तो लढला, मोठमोठ्या दिग्गजांचे त्याने पराभव केले. तीन निवडणुकांमध्ये त्याने मोठ्या मताधिक्यासह विजय मिळवला.’
‘आम्हालाही कधी वाटलं नव्हतं तो मुख्यमंत्री होईल. पण त्याच्या जन्माच्या वेळेला त्याची पत्रिका झाली, त्या पत्रिकेत माझ्या वडिलांनी बघितलं आणि सांगितलं की, हा घराण्याचं नाव उज्ज्वल करेल. पण एक गोष्ट आहे की, त्याच्या पत्रिकेत चंद्रबळ कमी आहे. मग त्यादृष्टीने जे उपाय करावे लागतात, ते करण्यात आले. आम्हाला खरोखर त्यावेळी वाटले नव्हते की तो मुख्यमंत्री होईल. कारण लॉ कॉलेजमध्ये तो पहिला आला, गोल्ड मेडलिस्ट होता. अतिश्य उत्तम वक्तृत्व असल्यामुळे वकिलीच्या क्षेत्रात चमकेल, निष्णात कायदेतज्ज्ञ होईल, असे वाटले होते. पण जीवनात कलाटणी कशी मिळते. तो काही दिवस नागपूरमधील नामांकित विधिज्ञ अणे यांच्याकडे कामाला होता. हा आपली कारकीर्द पुढे नेईल, असे त्यांना वाटत होते. पण जनसंघाने त्याला भाजपमध्ये पाठवले, तो तीनवेळा निवडून आला. खरोखर इतक्या लहान वयात राजकारणात अशी कामगिरी करणारा दुसरा कोणी झाला असेल, असे मला वाटत नाही. असा हा माझा पुतण्या, घरी असला की त्याच्या खोड्या चालू असतात. तो घरात राजकारणाच्या गोष्टीच करत नाही, कुटुंबाच्या गोष्टी करतो. त्यावेळी तो अतिश्य मोकळा असतो. असा हा माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल,’ असे मला वाटत असल्याचे बाळासाहेब फडणवीस यांनी म्हटले.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस हे सर्वगुणसंपन्न आहेत. ते अनेक भूमिका लीलया पार पाडतात. एक तर नक्की आहे, या माणसाला काहीतरी दैवी शक्ती मिळालेली आहे. कारण एका माणसामध्ये इतके गुण कधीच नसतात. म्हणजे तो संघटकही असतो, राज्यकर्ताही असतो, मित्रही असतो, तो वाचतोही प्रचंड, लिहतोही प्रचंड, तो कुटुंबवत्सलही आहे. प्रत्येकाच्या आयुष्यातील घटना लक्षात ठेवून तो अभिनंदन आणि सांत्वन करतो.’
चंद्रकांत पाटील यांनी एका माजी मुख्यमंत्र्यांचा उल्लेखही केला. मी त्या मुख्यमंत्र्यांचं नाव सांगणार नाही, मी केवळ वर्णन करेन, तुम्हाला समजून जाईल, असे त्यांनी म्हटले. या मुख्यमंत्र्यांकडे कोणत्या कामाचा प्रस्ताव घेऊन गेल्यानंतर ते उभे राहायचे. तुमचं निवेदन वाचायचे आणि त्यावर पेनाने खुणा करायचे. लोकांना वाटायचं की, मुख्यमंत्री इतक्या गांभीर्याने निवेदन वाचत आहेत म्हणजे काम करायला घेतील. पण नंतर हे मुख्यमंत्री ते काम करायचे नाहीत. याबाबत पुन्हा विचारणा केल्यानंतर मुख्यमंत्री सांगायचे की, ‘मी नंतर सांगतो तुम्हाला’. 100 पैकी 99 जणांना असंच उत्तर मिळायचं, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
आयुष्यभर केसाला तेल चोपड चोपड चोपडलं, पण त्याला बुद्धी आली नाही…
तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी; मंत्र्याकडे लेखी तक्रार…
RSS ने फक्त शैक्षणिक संस्थाच नव्हे तर ते व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतला : राहुल गांधी