अण्णा हजारे यांनी विद्यार्थ्यांसाठी उपसले आंदोलनाचे हत्यार; मोदींना खरमरीत पत्र…

anna-hazare
Share

पुणे : दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. अण्णा हजारे यांनी उद्या गुरुवारी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत अहिल्यानगरातील वाडिया पार्क येथील गांधी स्मारक येथे दोन तासांचे मौन आंदोलन करणार आहेत. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत, अशी भूमिका अण्णा हजारे यांनी घेतली आहे. लोकशाहीमध्ये संवादाऐवजी दडपशाहीचा मार्ग स्वीकारला जात असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे, या आंदोलनस्थळाला प्रतीकात्मक स्वरूपात “नगरचे जंतर-मंतर” असं नाव देण्यात येणार असून, या आंदोलनाकडे राज्यभरातील नागरिकांचे लक्ष लागलं आहे. अण्णांच्या आंदोलनामुळे सरकारची डोकेदुखी आता आणखी वाढणार आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

नीट पेपर लिक प्रकरणी दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने आक्रमक रूप घेतलं आहे. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून आता देशभरात आंदोलन होत आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. आता, लोकशाहीत जनतेचा आवाज दडपू नका, संवादातून मार्ग काढा’ असं म्हणत अण्णा हजारे यांनी थेट पंतप्रधान मोदींना खरमरीत पत्र लिहिलं आहे.

दरम्यान, काँग्रेस सरकारच्या काळात भ्रष्टाचार आणि लोकपाल विधेयकासाठी दिल्लीमध्ये रेकॉर्डब्रेक आंदोलन करून अण्णा हजारे यांनी देशाला जागं केले होते. देशभरात अण्णांच्या आंदोलनामुळे सरकारविरोधात लोक रस्त्यावर उतरले होते. पण, मागील अनेक वर्षांपासून अण्णा हजारे कोणत्याही आंदोलनाच्या व्यासपीठावर दिसले नाही. आता अण्णांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

अण्णांनी पत्रामध्ये म्हटले आहे की…

मा. पंतप्रधान, सप्रेम नमस्कार.
नवी दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल घडलेल्या हिंसाचाराच्या आणि पोलिसी कारवाईच्या बातम्या अत्यंत वेदनादायक आहेत. लोकशाही व्यवस्थेत अशा प्रकारच्या घटना घडणे कोणाच्याही हिताचे नाही. कोणत्याही परिस्थितीत हिंसा, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान किंवा अनावश्यक बळाचा वापर टाळला गेला पाहिजे, असे माझे ठाम मत आहे.

आज देशातील लाखो तरुण पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील विलंब, बेरोजगारी आणि इतर अनेक प्रश्नांमुळे अस्वस्थ आहेत. या अस्वस्थतेकडे केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून न पाहता, ती समाजातील वेदना आणि अपेक्षा म्हणून समजून घेणे आवश्यक आहे. यापूर्वी 2024 मध्ये नीटच्या परीक्षेचे पेपर फुटी व गोंधळ समोर आला. यावर्षी सुद्धा देशात 22 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसलेल्या असताना पेपर फुटली. 22 मुलांनी निराश होऊन आत्महत्या केल्या. फेर परीक्षेच्या निकालांमध्ये मोठा गोंधळ झाला असल्याच्या बातम्या आहे. सरकारी कारभारामध्ये काही गैरकारभार उघडकीस आला की त्याची जबाबदारी खालच्या माणसांवर टाकायची आणि चांगलं जे असेल त्याच श्रेय सरकारने घ्यायचं हे योग्य नाही.

वरिष्ठांची जनतेप्रती जबाबदारी व उत्तरदायित्व आहे म्हणून विद्यार्थी व पालक मागील 25 दिवसापासून रस्त्यावर शांततेच्या मार्गावर आंदोलन करत मंत्र्यांच्या राजीनामा मागत आहे. उत्तरदायित्व म्हणून एखाद्या मंत्र्याच्या राजीनामा घेतल्याने सरकारची सत्ता जाणार नाही उलट इतर मंत्र्यांना संदेश जाईल की, खात्याचा कारभार नीट केला नाही तर पदावरून दूर केले जाईल. यामुळे उलट सरकारचा कारभार अधिक चांगला होईल.

सोनम वांगचुक यांना ज्या पद्धतीने उपोषण स्थळावरून बळाचा वापर करून हलवण्यात आले ते करण्यापूर्वी त्यांच्याबरोबर सरकारने कोणतीही चर्चा केली नाही. इतक्या दिवसापासून दिल्लीत उपोषण चालू असतानाही सरकारचा कोणताच प्रतिनिधी किंवा सचिव लेवलच्या माणसाने जाऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्याची आवश्यकता सरकारला न न वाटणं योग्य नाही.

लोकशाहीमध्ये संवाद हा संघर्षापेक्षा नेहमीच श्रेष्ठ मार्ग असतो. म्हणून आपणास नम्र विनंती आहे की, जनतेच्या आवाजाकडे विरोधकांचा आवाज म्हणून पाहू नये. आंदोलन करणारेही आपल्या देशाचेच नागरिक आहेत. त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून, विश्वासाचे वातावरण निर्माण करून आणि सकारात्मक चर्चेद्वारे मार्ग काढणे हीच लोकशाहीची खरी कसोटी आहे.

आपला देश महात्मा गांधी यांच्या सत्याग्रहाच्या विचारांचा आणि भारतीय संविधानाने दिलेल्या लोकशाही मूल्यांचा वारसदार आहे. मतभेद असणे स्वाभाविक आहे; मात्र त्यांचे निराकरण संवाद, संवेदनशीलता आणि परस्पर आदराच्या माध्यमातूनच व्हायला हवे. शासनाने संयम, सहिष्णुता आणि संवेदनशीलतेचे दर्शन घडवावे, हीच अपेक्षा आहे.

जनतेचा विश्वास टिकविणे हे कोणत्याही लोकशाही सरकारचे सर्वोच्च कर्तव्य असते. आपण या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन आंदोलनकर्त्यांशी सकारात्मक संवाद साधून लोकशाही मूल्यांना बळकटी द्याल, अशी अपेक्षा व्यक्त करतो.

आपला,
( कि.बा.तथा अण्णा हजारे )

अण्णा हजारे आमरण उपोषणाला बसणार; फुटीर खासदारांवरही भडकले…

विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी राहुल गांधी, शरद पवार उतरले राजकीय मैदानात…

अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप; दिल्ली पोलिसांनी मुलींचे कपडे फाडले, छातीवर पाय दिला…

Video: कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप; दगडांनी भरलेला डम्पर अन्…

देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकुमशहा वाईट पंतप्रधान कधीच झाला नाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *