मुंबई : एसटी कामगार संघटनेचे नेते तथा वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दिल्लीतील सोनम वांगचुक यांच्या आंदोलनास पाठिंबा दिल्यावरुन सदावर्ते यांनी राज ठाकरे यांना काय ढेकळं कळतात का, असे म्हटले आहे. तसेच, सोनम वांगचुक यांचे आंदोलन म्हणजे युवकांच्या भावनांशी खेळ असून आता सोनम वांगचुक यांना हटवून राज ठाकरेंना उपोषणला बसवावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!
सोनम वांगचुक यांचं आंदोलन म्हणजे वैद्यकीय परीक्षेच्या आणि विद्यार्थ्यांच्या भावनांच्या आधारावर इमोशनल ब्लॅकमेलिंग करत पोळी भाजण्याचा प्रयत्न आहे, देशात आणि राज्यात ते सुरू झालंय. विद्यार्थ्यांच्या भावनांचा आधार घेत दिल्लीत आंदोलन सुरु आहे, लोकशाहीत आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र, हे भारतीय संविधानाला मानतात की नाही हा प्रश्न आहे, असे म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनावर टीका केली आहे. मनोज जरांगेची प्रकृती खराब होत असताना उच्च न्यायालयाने जे निर्देश दिले होते, आता दिल्ली उच्च न्यायालयातही याचिका दाखल झाली. मग सोनम वांगचूक यांना सांगायचं आहे का, ते संविधानापेक्षा मोठे आहेत. मरेपर्यंतचे उपोषण कोणालाही करता येत नाही, संविधान विरोधी हलगी का वाजवली जाते आहे, संविधानाविरोधी ढोकली का वाजवली जात आहे? असा सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी केला.
नीट पेपरफुटीप्रकरणी सोनम वांगचुक आणि राज ठाकरे यांना आता तपास अधिकारी करायचं का? ढोबळ भाषेत सांगायचं तर, राज ठाकरेंना ढेकळं कळतात का? अशी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली. राज ठाकरे आता वाजंत्रीवाल्यासारखं आता हलगी वाजवणारे झाले आहेत का? त्यांना त्यांचे प्रश्न संपले आहेत का? पेपरफुटी प्रकरण गंभीर, मात्र यंत्रणांवर विश्वास ठेवायचा असतो. आता, मुंबईत मोर्चा काढला जाईल, राज ठाकरेला आता सोनम वांगचुकचा पुळका आलाय. आता राईट टू लाईफच्या अधिकाराने सोनम वांगचुकला बाजूनला करत राज ठाकरे यांना उपोषणाला बसवावे. मात्र, बिना माल ओढता, असे म्हणत राज ठाकरे यांच्यावर गुणरत्न सदावर्ते यांनी जहाल टीका केली आहे.
गुणरत्न सदावर्ते यांचा मनसेवर हल्लाबोल; राज ठाकरेंची औलाद काय भाषा बोलते…