महाराष्ट्रात रॅकेट उघड! भाजपच्या 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक…

Share

चंद्रपूर : नवजात बाळांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणणारं एक मोठं रॅकेट उघडकीस आले असून, पोलिसांनी दोन भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे. दोन्ही महिला पदाधिकाऱ्यांवर या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

रामनगर पोलिसांनी बुधवारी सायंकाळी ही मोठी कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या महिलांमध्ये सायली येरणे (भाजप महिला आघाडी पदाधिकारी) आणि भाग्यश्री हांडे (भाजप युवती आघाडी सरचिटणीस) यांचा समावेश आहे. या दोन्ही महिला पदाधिकारी भाजपचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या कट्टर समर्थक मानल्या जातात. गुरुवारी या दोघींनाही न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे २०२६ मध्ये या रॅकेटचा मुख्य आरोपी अजय फुलझेले याने नागपुरात नवजात बाळाची विक्री करण्याचा कट रचला होता. तिथूनच या संपूर्ण प्रकरणाचे बिंग फुटले. या प्रकरणात पीडित अल्पवयीन मुलीची आई तसेच नवजात बालक खरेदी करणाऱ्या हैदराबाद आणि चंद्रपूर येथील दोन महिलांना आधीच अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान सायली येरणे आणि भाग्यश्री हांडे यांनी नवजात बालकांच्या विक्रीत मध्यस्थाची भूमिका बजावली होती, तसेच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि इतर प्रक्रियेत मदत केली होती. या सर्व आरोपींविरुद्ध मानवी तस्करी तसेच पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. बाळ विक्रीच्या या साखळीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच यामागे कोणते संघटित रॅकेट कार्यरत आहे का, याचा कसून तपास सुरू आहे.

पोलिस अधिकाऱ्याची महिला पोलिसाकडे शरीरसुखाची मागणीचे वक्तव्य; शिंदे गटाच्या नेत्यावर गुन्हा दाखल…

राजकीय नेत्याने लग्नाचे आमिष दाखवून ठेवले शारीरिक संबंध अन्…

अशोक खरात प्रकरणावरील चित्रपटावर रुपाली चाकणकर संतापल्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *