मुंबईः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील 6 खासदारांनी बंडखोरी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. या पक्षप्रवेश सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “आम्ही जे करतो ते फुलप्रूफ करतो” असे म्हणत ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्याचा दावा केला होता. इतकेच नव्हे, तर हे सहाही खासदार आगामी निवडणुकीत धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवतील आणि विजयीही होतील, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. या भव्य राजकीय घडामोडींनंतर आता शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी मोठे भूकंप होणार असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.
खासदार रवींद्र वायकर यांनी ‘ऑपरेशन टायगर’च्या पुढील टप्प्यांचे संकेत दिले आहेत. रवींद्र वायकर म्हणाले की, “ऑपरेशन टायगर वन सक्सेस झाल्यानंतर ऑपरेशन टायगर 2 आणि 3 होईल. प्रत्येक विषयाकडे सर्व बाजूंनी पाहण्याची गरज आहे. कामे पूर्ण होणे महत्त्वाचे असून त्यानुसार प्रक्रिया पुढे सुरू आहे. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, सर्व पैलू विचारात घेणे आवश्यक आहे. ऑपरेशन टायगर एक झाले, दोन झालं. विकास कामे होणे गरजेचे असते. ज्यांना वाटते कामे व्हावीत ते येऊ शकतात. मिशन टायगर 2, 3 यापुढे पण होईल,” असा दावा त्यांनी केला आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!
दरम्यान, शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील यांसारख्या बड्या खासदारांनी मतदारसंघाच्या विकासासाठी पुरेसा निधी मिळत नसल्याने कामे रखडत असल्याचा दावा केला होता. मात्र, विकास निधी मिळत नसल्याची तक्रार करणाऱ्या या खासदारांच्या मतदारसंघांसाठी निधी मंजूर झाल्यानंतरही त्यातील मोठा हिस्सा खर्चच करण्यात आला नसल्याची माहिती समोर आल्याने या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या खासदार निधी वाटपाच्या वादावर आणि आकडेवारीवर खासदार रवींद्र वायकर यांनी वस्तुस्थिती मांडत बंडखोर खासदारांची बाजू सावरून धरली आहे.
रवींद्र वायकर म्हणाले की, “निधी मंजूर झाला म्हणजे खर्च झाला असे होत नाही. काम पूर्ण झाल्यानंतर आणि पेमेंट झाल्यानंतरच तो खर्च म्हणून दाखवला जातो. आमदार, खासदार आणि नगरसेवकांच्या अनेक कामांचे पेमेंट प्रलंबित असते. कामे पूर्ण झाली असली तरी निधीचे वितरण झालेले नसल्याने आकडेवारीत दिसत नाही. 106 पैकी 100 कामे पूर्ण झाली असतील, मात्र पेमेंट बाकी असल्याने ती नोंदीत दिसत नाहीत.”
विरोधकांना इशारा! माझ्या नादाला लागलात तर हॉस्पिटलमध्ये जाल नाहीतर स्मशानात…
गद्दारांना कोणतीही भूमिका नसते; ओम निंबाळकर हे नामचिन गद्दार : संजय राऊत