रायपूर (छत्तीसगड) : वाळूचं खोदकाम आणि त्याची वाहतूक यावरुन झालेल्या भांडणातून हल्लेखोरांनी भाजप नेता भारत सिंह ऊर्फ लाला सिंह यांच्या फॉर्च्युनर कार दोन ट्रकच्या मधोमध अडकली. त्यानंतर कारवर पेट्रोल टाकून ती पेटवण्यात आली. यामध्ये भारत सिंह यांच्यासह तीन जणांचा जळून मृत्यू झाला आहे. कोरिया जिल्ह्यात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, या परिसरातील रेतीचं कंत्राट ठाकूर भारत सिंह यांच्या कुटुंबाकडे होते. त्रिपाठी कुटुंबाकडे रेतीची वाहतूक करणारे ट्रक आहेत. दोन्ही कुटुंबांमध्ये पैशांचे व्यवहार आणि वर्चस्वावरुन गेल्या अनेक महिन्यांपासून वाद सुरू होते. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास भारत सिंह त्यांच्या साथीदारांसह निघाले होते. तेव्हा हल्लेखोर रस्त्यात दबा धरुन बसले होते. त्यांनी भारत सिंह यांच्यावर हल्ला केला.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!
हल्लेखोरांनी भारत सिंह यांची फॉर्च्युनरच्या पुढे आणि मागे ट्रक उभे केले. सिंह पळून जाऊ नयेत याची पूर्ण खबरदारी घेण्यात आली. यानंतर त्यांच्या कारवर पेट्रोल टाकून ती पेटवण्यात आली. भारत सिंह त्यांचे चुलत भाऊ नागेंद्र सिंह, विरेंद्र सिंह यांचा जळून मृत्यू झाला आहे. मयंक सिंह यांची प्रकृती नाजूक आहे. घटनेनंतर कोरिया जिल्ह्यात तणाव असून पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे.
पोलीस अधीक्षक सुरेश चौबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली आहे. या ९ जणांची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आली आहे. अक्षत त्रिपाठी, विशाल त्रिपाठी यांचा अटक केलेल्यांमध्ये समावेश आहे.