राजकीय नेत्याने लग्नाचे आमिष दाखवून ठेवले शारीरिक संबंध अन्…

political-leader
Share

मुंबई : दहिसर-बोरिवली भाजप मंडल महामंत्री सूरज प्रतापसिंह देवडा यांच्याविरोधात गंभीर आरोपाखाली गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. बारमधील तरुणींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून आणि कंपनीत नोकरी देण्याचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे.

विवाहित असूनही स्वतःला अविवाहित असल्याचे सांगितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे, त्याचबरोबर आरोपीकडून लाखो रूपये उकळल्याचंही समोर आलं आहे. त्याचबरोबर गन दाखवून धमक्या दिल्याची तक्रारीत नोंद करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच आरोपी सूरज देवडा हा फरार झाला असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. पीडित युवतीने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, सूरज देवडा याने आपण विवाहित असूनही स्वतःला अविवाहित असल्याचे सांगितले. एका मोठ्या कंपनीत सीए (CA) ची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. “माझ्यासह इतरही अनेक मुलींचे यात शोषण झाले आहे,” असा खळबळजनक दावाही पीडितेने आपल्या तक्रारीत केला आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

दरम्यान, सूरज देवडा याने पीडित तरुणीवर एका बारमध्ये तब्बल ५० हजार रुपयांच्या नोटा उडवल्याचा दावाही समोर आला आहे. केवळ एवढेच नव्हे, तर विश्वास संपादन केल्यानंतर त्याने पीडितेकडून लाखो रुपये उकळल्याचाही आरोप आहे. जेव्हा तरुणीने या सर्व प्रकाराला विरोध करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिला थेट गन (बंदूक) दाखवून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याची नोंद तक्रारीत करण्यात आली आहे.

या प्रकरणाचे गांभीर्य आणि भाजप नेत्याचे नाव समोर आल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी तातडीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यांच्या थेट आदेशानंतरच दहिसर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाची संवेदनशीलता पाहता हा तपास आता मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे विशेष पथक सध्या फरार आरोपी सूरज प्रतापसिंह देवडा याच्या शोधासाठी विविध ठिकाणी छापे टाकत आहे.

नेत्यांच्या रुममध्ये गेल्याशिवाय 90 टक्के महिला राजकारण करूच शकत नाहीत; मोबाईल तपासा…

नाशिक! अशोक खरात याच्या विकृतीचा नवा Video समोर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *