महागाईचा मोठा फटका! CNG, PNG च्या दरात पुन्हा वाढ…

petrol
Share

पुणे: पुण्यात सीएनजी (CNG) आणि पीएनजीच्या (PNG) दरात पुन्हा दरवाढ करण्यात आली आहे. सीएनजीच्या दरात किलोमागे एक रुपयांची, तर पीएनजीच्या (PNG) दरात 85 पैशांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे वाहनधारकांना महागाईचा मोठा फटका बसणार आहे.

MNGL कडून मध्यरात्री पासून सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली असून सोमवारी म्हणजेच काल रात्रीपासून हि दरवाढ लागू करण्यात आली आहे. दरवाढीनंतर सीएनजीची किंमत 95.75 प्रति किलो झाली आहे. नैसर्गिक वायूच्या खरेदी खर्चात वाढ झाल्याने सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

केंद्र सरकारने डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (एटीएफ) च्या निर्यातीवरील शुल्कात वाढ केली आहे. सरकारच्या नवीन निर्णयानुसार, आता डिझेलच्या निर्यातीवर प्रति लिटर ₹14 आणि एटीएफच्या निर्यातीवर प्रति लिटर ₹12.50 शुल्क आकारले जाईल. मात्र, पेट्रोलच्या निर्यातीवरील शुल्कात कोणताही बदल झालेला नाही. यामुळे येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढू शकतात का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

CNG दरात 15 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ; पीएनजीचे दरही वाढले…

महागाईचा भडका! देशात पेट्रोल-डिझेलचे दर 10 दिवसांत चौथ्यांदा वाढले; पाहा नवीन दर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *