खळबळजनक दावा! पंतप्रधान मोदी अन् अभिजीत दीपके यांची गुप्त भेट…

sanjay-raut
Share

मुंबईः कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके आणि नरेंद्र मोदी यांची अमेरिकेत बैठक झाली असल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. अभिजीत दीपके आणि मोदी यांच्या भेटीचे फोटो मला एकाने पाठवले आहेत. मोदींच्या भेटीनंतरच दीपके भारतात आल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

अभिजीत दीपके यांनी अमेरिकेतून भारतात परतल्यानंतर पहिल्यांदा दिल्लीमध्ये जंतर मंतरवर आंदोलन केल्यानंतर पुण्यामध्ये त्यांच आंदोलन होत आहे, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन केलं जात आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टी (Cockroach चर्चा सुरू असताना आता संजय राऊत यांनी हा मोठा दावा केलेला आहे, अमेरिकेमध्ये मोदी आणि दीपके यांच्या भेटीच्या दाव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

अभिजीत दिपके आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेत जी मीटिंग झाली त्याचे फोटो एकाने पाठवले आहेत. त्याच्यानंतर दिपके भारतात आले अशी माहिती काही लोकांनी सांगितली. मी हे आरोप करत नाही, माझी माहिती लोकांनी पोहोचवलेली आहे, ती मी सांगत आहे, आम्ही त्यांच्या भूमिकेला समर्थन दिलं, मात्र जेव्हा काही माहिती या सगळ्या संदर्भात समोर येते, तेव्हा माध्यमांसमोर मांडणे आवश्यक आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता त्या आंदोलनाला गेला नाही. तरुणांचे प्रश्न आणि तरुणांना आम्ही पाठिंबा दिला. जे तरुण रस्त्यावर उतरले आहेत, त्या तरुणांचे सरकारने ऐकायला हवं यासाठी आम्ही भूमिका मांडली. या माध्यमातून सरकारला मदत करत असेल तर त्यावर लक्ष ठेवणं आमचं काम आहे, असेही संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

धोक्याचा इशारा! कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दिपके यांचा नवा Video व्हायरल…

राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी! शिंदे गटाला संजय राऊत यांची खुली ऑफर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *