अन्नातील आणि औषधातील भेसळीच्या तक्रारासाठी टोल फ्री नंबर जारी…

tukaram-mundhe
Share

मुंबईः IAS तुकाराम मुंढे यांनी नुकतीच अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारली. यानंतर राज्यभरात तिबंधित गुटखा-पानमसाला विक्रेत्यांविरोधातील कारवाईचा तडाखा लावण्यात आला आहे. राज्यभरात प्रतिबंधित गुटखा आणि पानमसालाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीमा राबवत असून, 6 दिवासांत 203 छापे टाकले आहेत. यामध्ये 102 अटक करण्यात आली आहे. राज्यभरातील जवळपास 68 दुकानं आणि हॉटेल्स बंद करण्यात आली.

अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कडक शब्दांत इशारा दिला आहे. आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही, असं म्हणत कारवाई अधिक तीव्र होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच आता जनतेला थेट तक्रार करण्याचं आवाहन केले आहे. यासाठी टोल फ्री क्रमांक आणि ई-मेल आयडी शेअर करण्यात आला आहे. अन्न व औषधाबाबत किंवा गुटखा आणि पानमसालाबाबत नेमकी कुठे तक्रार करायची याची नागरिकांनी माहिती नसते. त्यामुळे आता मुंढे यांनी नागरिकांनी थेट त्यांच्याकडे तक्रार करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे.

अन्नातील आणि औषधातील भेसळीच्या तक्रारासाठी टोल फ्री नंबर-
टोल फ्री क्रमांक : 1800222365
ई-मेल : jc-foodhq@gov.in

दरम्यान, गेल्या काही काळापासून अन्न आणि औषध प्रशासन खात भ्रष्टाचाराच्या आरोपावरून चर्चेत आले होते. लाचखोरी आणि इतर भ्रष्ट कामांमुळे चर्चेत असलेल्या अन्न आणि औषध प्रशासनात आता आयुक्त म्हणून तुकाराम मुंढेंची बदली करण्यात आली आहे. तसा आदेश राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केला होता. त्यानुसार 25 मे रोजी तुकाराम मुंढे हे अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला होता.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

तुकाराम मुंढे यांची आतापर्यंत कोणत्या ठिकाणी झाली बदली…
ऑगस्ट 2005 – प्रशिक्षणार्थी, उपजिल्हाधिकारी सोलापूर
सप्टेंबर 2007 – उप जिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग
जानेवारी 2008 – सीईओ, जिल्हा परिषद नागपूर
मार्च 2009 – आयुक्त, आदिवासी विभाग
जुलै 2009 – सीईओ, वाशिम
जून 2010 – सीईओ, कल्याण
जून 2011 – जिल्हाधिकारी, जालना
सप्टेंबर 2012 – विक्रीकर सहआयुक्त मुंबई
नोव्हेंबर 2014 – सोलापूर जिल्हाधिकारी
मे 2016 – आयुक्त, नवी मुंबई महापालिका
मार्च 2017 – मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएल, पुणे
फेब्रुवारी 2018 – आयुक्त, नाशिक महापालिका
नोव्हेंबर 2018 – सहसचिव, नियोजन
डिसेंबर 2018 -प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई
जानेवारी 2020 – आयुक्त, नागपूर महापालिका
ऑगस्ट 2020 – सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई
जानेवारी 2021 – राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत
सप्टेंबर – 2022 – आयुक्‍त आरोग्‍य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान
2022 – मराठी भाषा विभाग
जुलै 2022 – पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभाग
जून 2024 – विकास आयुक्त (असंघटित कामगार)
ऑगस्ट 2025: सचिव, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, मंत्रालय
मे 2026: आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

IAS तुकाराम मुंढे यांची २१ वर्षात २५वी बदली; पाहा आता कुठे नियुक्ती…

तुकाराम मुंढे यांना थेट निलंबित करण्याची मागणी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *