नवी दिल्ली: देशातील राज्यसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने १० राज्यातील २४ जागांसाठी आणि दोन जागांवरील पोटनिवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रात एका जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील १० राज्यांमधील राज्यसभेच्या २४ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. जून आणि जुलै २०२६ मध्ये कार्यकाळ संपत असलेल्या २४ सदस्यांच्या रिक्त होणाऱ्या जागा भरण्यासाठी हे मतदान घेतले जाणार आहे. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि दिग्विजय सिंह यांच्यासारख्या देशातील दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!
राज्यसभेच्या दोन जागांवर पोटनिवडणूक देखील होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने एक जागा रिक्त झाली आहे. तर, तामिळनाडूमध्ये अण्णाद्रमुकचे सी. षण्मुगनम यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या जागेवर पोटनिवडणूक होईल. सुनेत्रा पवार यांच्या जागी होणाऱ्या पोटनिवडणुकीतील सदस्याचा कार्यकाळ हा ४ जुलै २०२८ पर्यंत असणार आहे.
‘या’ १० राज्यांमध्ये होणार निवडणूक; आंध्र, गुजरात, कर्नाटकमध्ये सर्वाधिक जागा निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेश, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, मणिपूर, मेघालय, राजस्थान, अरुणाचल प्रदेश, कर्नाटक आणि मिझोराम या १० राज्यांमधील जागांचा यात समावेश आहे.
यात सर्वाधिक ४-४ जागा आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक या राज्यांमधून रिक्त होत आहेत. तर मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून प्रत्येकी ३ जागा, झारखंडमधून २ जागा आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मिझोराममधून प्रत्येकी १ जागा रिक्त होत आहे.
निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक:
अधिकृत अधिसूचना: १ जून २०२६
उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख: ८ जून २०२६
अर्जांची छाननी (Scrutiny): ९ जून २०२६
अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख: ११ जून २०२६
मतदानाचा दिनांक व वेळ: १८ जून २०२६ (सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत)
मतमोजणी आणि निकाल: १८ जून २०२६ (त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजल्यापासून)
निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याची तारीख: २० जून २०२६