मुंबईः मुंबईच्या भांडुपमधील काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि त्यांच्या कुटुंबावर भांडुप पोलीस ठाण्यात अपहरण, मारहाण आणि धमकावल्याप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका महिलेचे अपहरण करून तिला बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप नगरसेविकेवर करण्यात आला आहे.
भांडुप प्रभाग क्रमांक ११० च्या काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका आशा कोपरकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामध्ये आशा कोपरकर (नगरसेविका), त्यांच्या दोन मुली, जावई, मुलगा आणि त्यांचा खासगी कार चालक यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशा कोपरकर या भांडुपमधील काँग्रेस नेते सुरेश कोपरकर यांच्या पत्नी आहेत.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!
काँग्रेस नेते सुरेश कोपरकर यांचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय नगरसेविका आशा कोपरकर आणि त्यांच्या कुटुंबीयांना होता. याच संशयातून संतापलेल्या कोपरकर कुटुंबाने त्या पीडित महिलेचे अपहरण केले आणि बेदम मारहाण केली. तसेच त्यांनी जीवे मारण्याची धमकीही दिली, असा आरोप पीडित महिलेनं केला आहे. या प्रकारानंतर पीडित महिलेने थेट भांडुप पोलीस ठाणे गाठून कोपरकर कुटुंबीयांविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून नगरसेविका आशा कोपरकर, त्यांच्या दोन्ही मुली, जावई, मुलगा आणि चालकावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपस करत आहेत.