अजितदादा गटाच्या कारभाराबाबत एक खळबळजनक आरोप…

rohit-pawar
Share

मुंबईः शरद पवार गटाचे आमदार आणि अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी अजितदादा गटाच्या कारभाराबाबत एक खळबळजनक आरोप केला आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या अधिकृत बँक खात्यामधून काही लोकांनी स्वत:च्या घराचे भाडे आणि ब्युटी पार्लरचे पैसे दिल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. या गोष्टी अजित पवार यांना समजल्या तेव्हा ते प्रचंड संतापले होते, असे रोहित पवार यांनी म्हटले.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

आम्ही जे ऐकलं होतं त्यानुसार, अजितदादा गटाच्या पक्षाच्या अधिकृत बँक खात्यातून कोणाच्या घराचं भाडं, ब्युटी पार्लरचे पैसे दिले गेले, खासगी कारणासाठी हेलिकॉप्टर वापरले होते, त्याचे कोट्यवधी रुपयांचं बिलही राष्ट्रवादीच्या बँक खात्यातून देण्यात आले. या गोष्टी अजित पवार यांना माहिती होत्या, त्यामुळे ते प्रचंड संतापले होते. त्यांनी या गोष्टी बोलूनही दाखवल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवे पदाधिकारी आणि खजीनदार ही गोष्ट करणार नाहीत, अशी अपेक्षा आहे. राजकारणात अनेकदा स्वार्थ महागात पडतो. पवार साहेबांसोबत असलेले काही मोठे नेते होते, त्यांना पवार साहेबांनीच ताकद दिली होती. हे नेते साहेबांची साथ सोडून अजितदादांसोबत गेले. त्यांनी अजितदादांनाही त्रास दिला, अशी चर्चा आहे. अजितदादा यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याची गरज होती. पण तिकडे वेगळंच राजकारण सुरु झालं, पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला. तुम्ही इतकं स्वार्थी वागाल तर तुम्हाला न्याय कसा मिळेल, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला.

रोहित पवार यांनी अजितदादा गटातील नाराजी नाट्यावरही भाष्य केले. त्यांनी म्हटले की, आम्ही त्यांच्या पक्षाच्या कार्यकारिणीची नवीन यादी पाहिली. त्यामध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांना महत्त्वाची पदं दिलेली नाहीत. याचा अर्थ राहिलेली पदं ही खूप लाहन आहेत. त्यामुळे या नेत्यांचे डिमोशन झाले किंवा त्यांना साईडलाईन करण्यात आले, असे म्हणावे लागेल. हा त्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. मी त्याबाबत फार बोलणार नाही, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीतील नाराजीनाट्याच्या पार्श्वभूमीवर गुप्तभेट; कोणाला सुगावाही नाही…

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात सावळागोंधळ…

चर्चांना उधाण! बारामतीचा पुढचा वारसदार कोण? तिसऱ्या पिढीचे दौरे अन्…

सुप्रिया सुळे म्हणाल्या; पवार यांच्या विरोधात निवडणूक लढणार नाही, मागच्या वेळेस…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *