सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेचा दिला राजीनामा; नियम काय सांगतो पाहा…

ajit-pawar-sunetra-pawar
Share

मुंबईः राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून त्या निवडून आल्या आहेत, त्यामुळे त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

सुनेत्रा पवार यांनी दिल्लीत उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन अधिकृतपणे आपला राजीनामा सोपवला. बारामती विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर त्या आता राज्याच्या विधानसभेत बारामतीचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अनेक दिवसांपासून सुनेत्रा पवार राजीनामा कधी देणार, याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, यामागे एक महत्त्वाचा कायदेशीर नियम आहे. ‘लोकप्रतिनिधी कायदा १९५१’ नुसार, जर एखादी व्यक्ती आधीच एका सभागृहाची (उदाहरणार्थ- राज्यसभा किंवा लोकसभा) सदस्य असेल आणि ती दुसऱ्या सभागृहाच्या (उदाहरणार्थ- विधानसभा) निवडणुकीत निवडून आली, तर तिला निकाल लागल्यापासून १४ दिवसांच्या आत एका सभागृहाचा राजीनामा देणे बंधनकारक असते. जर विहित मुदतीत राजीनामा दिला नाही, तर संबंधित व्यक्तीचे आधीचे सदस्यत्व आपोआप रद्द होऊ शकते.

लोकप्रतिनिधी कायदा १९५१ हा भारतातील संसद आणि राज्य विधिमंडळांच्या निवडणुका घेण्याशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाचा कायदा आहे. हा कायदा उमेदवारांची पात्रता, अपात्रता, राजकीय पक्षांची नोंदणी, निवडणूक गुन्हे आणि निवडणूक विवादांचे निराकरण यांसारख्या बाबींवर नियंत्रण ठेवतो, ज्यामुळे निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष पार पडतात.

सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्याने राज्यसभेची एक जागा आता रिक्त झाली आहे. या रिक्त झालेल्या जागेवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लवकरच पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडून या जागेवर कोणाला संधी दिली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवार यांची मनाला भिडणारी पोस्ट…

अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत सुनेत्रा पवार यांनी महत्वाचं विधान…

अजितदादांवरची चित्रफित पाहून सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यातले अश्रू थांबेनात…

अजित पवार यांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *