विश्वविक्रमाबद्दल सुनील सांबारे यांचा इंदोर येथे सन्मान!

sunil-sambare-indore
Share

इंदोर (मध्य प्रदेश): गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष सुनील सांबारे यांनी 11 जानेवारी 2026 रोजी १ तास ११ मिनिट ११ सेकंद लाठी-काठी फिरवण्याचा ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’ हा विश्वविक्रम यशस्वीरित्या सादर करण्यात आला होता. इंदोर येथे शेरेटोन ग्रँड पॅलेस या ठिकाणी श्री. सांबारे यांचा सन्मान करण्यात आला.

इंदोर येथे झालेल्या कार्यक्रमावेळी स्वामी देवेंद्र ब्रह्मचारी (आध्यात्मिक नेते), देवराज परमार (सामाजिक कार्यकर्ते, इंदरसिंग परमार (कॅबिनेट मंत्री, मध्य प्रदेश शासन यांचे सुपुत्र), अनिल जेठवानी (जीएसटी विभाग, भारत सरकार), कमल घिमिरे (भारतीय चित्रपट व टीव्ही अभिनेते) यांच्या हस्ते श्री. सांबारे यांचा सन्मान करण्यात आला. श्री. सांबारे यांच्यावर विविध ठिकाणांहून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पुणे येथे गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष सुनील सांबारे आणि युनिक इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय कोबारणे यांच्या नेतृत्वाखाली 11 जानेवारी 2026 रोजी १ तास ११ मिनिट ११ सेकंद लाठी-काठी फिरवण्याचा ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’ हा विश्वविक्रम यशस्वीरित्या सादर करण्यात आला. या सादरीकरणातील उल्लेखनीय बाब म्हणजे 3 वर्ष ते १३ वर्ष वयोगटातील विद्यार्थी सहभागी होते.

विद्यार्थ्यांनी सलग 1 तास 11 मिनिटे आणि 11 सेकंद लाठी–काठी फिरवून हा विक्रम प्रस्थापित केला. विश्वविक्रम पुणे शहरात प्रथमच युनिक इंटरनॅशनल स्कूल, लोहगाव येथे पार पडला होता.

पुण्यात प्रथमच लाठी–काठीचा वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *