मुंबई : राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांना पक्षात एकटे पाडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात तटकरे आणि पटेल यांचे पदनाम नसल्याने त्यांना पदच्युत केले गेले काय? अशा चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीतल्या संघर्षाची पूर्ण राज्यभर चर्चा झाली. आपल्या अस्तित्वावरच विषय आल्याने प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पक्षाचे कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे यांच्यात खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला १० मार्च रोजी पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी स्वत:च्या अध्यक्षपदाचा उल्लेख केला. परंतु, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पदाचा उल्लेख केला नाही. विशेष म्हणजे या पत्रात शिवाजीराव गर्जेंचा खजिनदार म्हणून आवर्जून उल्लेख करण्यात आला होता. शिवाजीराव गर्जे हे पवार कुटुंबाचे विश्वासू मानले जातात.
शिवाजीराव गर्जे यांचा पत्रात उल्लेख केला, मग तटकरे-पटेल यांच्या पदांचा उल्लेख पत्रात का नव्हता? असा प्रश्न अनेकांना पडला. यावरून तटकरे-पटेल यांचे पक्षातील स्थान धोक्यात आल्याची चर्चाही रंगली. यावरून मोठा वादंग उठलेला असताना ते पत्र कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे यांनीच तयार केल्याचे सांगितले जाते. सुनील तटकरे यांना हे कळाल्यावर त्यांनी गर्जे यांना झापल्याची चर्चा आहे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
२६ फेब्रुवारीला झालेल्या कार्यकारीणीच्या कागदपत्रात केवळ राष्ट्रीय अध्यक्ष आणि कोषाध्यक्ष यांच्या पदांचा उल्लेख करण्यावरून सुनील तटकरे यांनी शिवाजीराव गर्जे यांना समज देण्यात आल्याचे कळते. सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेले पत्र तयार करण्याची जबाबदारी कोषाध्यक्ष असलेल्या आमदार शिवाजीराव गर्जे यांच्यावरच होती. याच पत्रावरून राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत कलह सुरू असल्याची चर्चा झाली.