अमेरिका-इराण युद्धामुळे काय महागलं? काय स्वस्त झालं…

US-F-15-Crashes-in-Kuwait
Share

मुंबई : इराण-इस्त्राईल-अमेरिका युद्धाचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवर दिसून येत आहे. विशेषतः इराणमधून होणारी आयात ठप्प झाल्याने सुका मेव्याचे दर झपाट्याने वाढले आहेत, तर दुसरीकडे निर्यात खंडित झाल्यामुळे बासमती तांदळाच्या किमतीत घसरण झाली आहे.

पिस्ता आणि बदामाचे दर गगनाला…
इराणमधून मोठ्या प्रमाणात आयात होणारा पिस्ता सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी १,६५० रुपये प्रति किलो दराने मिळणारा इराणी पिस्ता आता थेट २,४०० रुपयांवर पोहोचला आहे. आयात पूर्णपणे थांबल्याने बाजारात उपलब्धता कमी झाली आणि दरात मोठी उसळी आली. बदाम १,८०० रुपयांवरून थेट २,८०० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. किरकोळ विक्रेत्यांच्या मते, साठा कमी होत चालल्याने पुढील काही आठवड्यांत दर आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुका मेव्यात सर्वाधिक वाढ जर्दाळूमध्ये नोंदवली गेली आहे. ७५० रुपयांवर मिळणारा जर्दाळू आता १,४०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. जवळपास ८५ टक्के वाढ झाल्याने ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे. पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे जर्दाळू जवळपास दुप्पट महागला असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

बासमती तांदूळ स्वस्त…
इराण हा भारतीय बासमती तांदळाचा मोठा खरेदीदार मानला जातो. सध्या तेथे निर्यात थांबल्याने देशांतर्गत बाजारात तांदळाचा साठा वाढला आहे. परिणामी ७,१०० रुपये प्रति क्विंटल असलेला दर घसरून ५,९०० रुपयांवर आला आहे. सुमारे १६ टक्क्यांची घसरण झाल्याने व्यापाऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. या परिस्थितीचा परिणाम महाराष्ट्रातील निर्यातदारांवरही झाला आहे. जालना, मुंबई, नाशिक आणि नागपूर येथून दुबईकडे जाणारी कांदा, मका, मिरची, टोमॅटो आणि डाळिंबाची निर्यात सध्या ठप्प झाली आहे. सुमारे ३७० कंटेनर मालासह दुबईमध्ये अडकून पडले आहेत.

दरम्यान, निर्यात थांबल्यामुळे शेतमालाचे दर घसरत आहेत, तर आयात बंद झाल्याने सुका मेवा महागतो आहे. व्यापाऱ्यांच्या मते, परिस्थिती लवकर सुरळीत न झाल्यास बाजारातील अस्थिरता आणखी वाढू शकते.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

भारत इराणमधून काय आयात करतो..
कच्चे तेल – इराण- इस्त्रायल युद्धामुळे भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीवर परिणार होणार आहे. भारताने इराणकडून आयात करण्यात येणाऱ्या तेलाचे प्रमाण जरी कमी केलं असलं तरीही याचा परिणाम मोठा होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या आयातीवर परिणाम झाला तर देशांतर्गत इंधनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. हे युद्ध जर दीर्घकाळ सुरू राहिलं तर घरगुती वापराचा एलपीजी गॅस महागणार असून पेट्रोलच्या दरातही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

पेट्रोकेमिकल आणि रासायनिक खते – इराण हा रासायनिक खतांचा मोठा उत्पादक देश आहे. पश्चिम आशियातील देशांकडून भारत मोठ्या प्रमाणावर खते आयात करतो. युद्ध जर दीर्घकाळ सुरू राहिलं तर खतांच्या किमतीत 30 ते 40 टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सुकामेवा आणि फळे –
इराणमधून भारत सुकामेवा, खजूर, काजू, बदाम पिस्ता आयात करतो. या युद्धामुळे भारतात आयात होणाऱ्या सुकामेव्याच्या किमतीत मोठी वाढ होताना दिसत आहे. मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये आणि वाशी मार्केटमध्ये सुक्या मेव्याच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचं दिसून येतंय.

कडधान्य महागण्याची शक्यता – भारतात मोठ्या प्रमाणात येणाऱ्या डाळी आणि कडधान्यांच्या आयातीला या युद्धाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

भारताच्या निर्यातीवर काय परिणाम…
कांद्याची निर्यात ठप्प
या युद्धामुळे भारतातील पश्चिम आशियाला होणाऱ्या कांद्याची निर्यात ठप्प झाल्याचं दिसून येतंय. त्याचा फटका विशेषतः नाशिकला बसल्याचं दिसतंय. नाशिकमधील पश्चिम आशियाला जाणारे कांद्याचे सुमारे 160 कंटेनर हे मुंबई बंदरावर अडकले आहेत.

कांद्याची निर्यात ठप्प झाल्याने देशांतर्गत आवक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांद्याच्या किमतीत मोठी घसरण होणार असून त्याचा फटका हा थेट शेतकऱ्यांना बसणार आहे.

केळी निर्यात ठप्प
भारतातून पश्चिम आशियामध्ये मोठ्या प्रमाणावर केळी निर्यात केली जातात. एकट्या जळगावमधून पश्चिम आशियात 12 कंटेनर केळी आखाती देशात निर्यात केली जातात. ती निर्यात आता थांबल्याचं चित्र आहे. त्यामुळे केळांच्या किमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता आहे.

जळगाव केळी निर्यात
जळगावमधून रोज 12 कंटेरन केळी आखाती देशात जातात, ती निर्यात आता थांबली आहे. युद्धापूर्वी केळी ही 2500 रुपये प्रति क्विंटल इतकी होती, आता ती 1500 रुपयांवर आली आहेत. केळी हा नाशवंत माल असल्याने शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.

द्राक्ष निर्यातीला फटका
रमजानच्या महिन्यात भारतातील द्राक्षांच्या मागणीला पश्चिम आशियातून मोठी मागणी असते. ती आता ठप्प झाली आहे.

सोन्या चांदीच्या दरात वाढ
इराण-इस्त्रायल युद्धामुळे भारतातील सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. एकाच दिवसात सोन्याचे दर 7 हजारांनी तर चांदीचे दर 20 हजारांनी वाढले आहेत. युद्ध दीर्घकाळ सुरू राहिलं तर या दरात सातत्याने वाढ होण्याची शक्यता आहे. युद्ध जरी पश्चिम आशियामध्ये सुरू असलं तरी त्याचा फटका मात्र भारतासारख्या देशांना बसत आहे. युद्धखोर अमेरिका आणि इस्त्रायलने त्यांच्या फायद्यासाठी हे युद्ध सुरू केलं असलं तरी त्याचा फटका तर प्रत्यक्ष युद्धाशी काहीही संबंध नसलेल्या भारतासारख्या देशांना बसतोय.

Video: अमेरिकेचं फायटर जेट कुवेतमध्ये कोसळलं, पायलटला जिवंत पकडलं…

Video: अमेरिका-इस्त्रायलच्या हल्ल्यांना इराणचं जोरदार प्रत्युत्तर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *