एकनाथ शिंदे यांच्या सोबतच्या भेटीवर राज ठाकरे यांनी सोडलं मौन…

raj-thackeray
Share

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. या भेटीवर राज ठाकरे यांनी मौन सोडले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. राज ठाकरे हे उद्धव यांची साथ सोडणार का, यावरही तर्क लढवले जात होते. मात्र, राज ठाकरे यांनी आपली भेट मुंबई आणि शहरातील प्रश्नांच्या अनुषंगाने भेट घेतली असल्याचे स्पष्ट केले. काल आपण एकनाथ शिंदे यांना भेटलो, उद्या मुख्यमंत्र्यांनाही भेटू असेही त्यांनी म्हटले.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

मुंबईत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी आज (शुक्रवार) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी म्हटले की, ‘एकनाथ शिंदे यांच्यासोबतची भेट ही राजकीय नव्हती. आता निवडणुका संपल्या आहेत. ते सत्तेत आहेत. आम्हाला जर काही सांगायचे असेल, काही चांगल्या गोष्टी करुन घ्यायच्या असतील, तर भेट घेतलीच पाहिजे. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायची गरज नाही.’

आपल्याकडे चांगले रस्ते, फ्लायओव्हर्स व्हावेत चांगली गोष्ट आहे. मात्र आपण मूळ गोष्टीला हात घालत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होते आहे. मात्र, ही एक सूज आहे. त्याचा लोकांना किती त्रास होतोय, मलाही होतोय. लोकांकडे एकापेक्षा जास्त कार असातत. अनेक इमारतींमध्ये पार्किंगचा मोठा मुद्दा आहे. मागे हीच गोष्ट मी मुख्यमंत्र्यांना भेटून सांगितली होती. एकनाथ शिंदेंनी लगेच भूषण गगराणींना फोन करून सांगितल्याचे राज यांनी सांगितले. लोकांच्या प्रश्नासाठी आपण काल एकनाथ शिंदे यांना भेटलो, उद्या मुख्यमंत्र्यांना देखील भेटू असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *