पुणे: पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील आंबेठाण पाईट येथे जिल्हा परिषद गटात मतदानादरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सुनिता बुट्टे यांच्या पतीवर अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
शरद बुट्टे पाटील यांनी काही दिवसापूर्वीच भाजपातून अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. या हल्ल्यात माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच माजी गटनेते शरद बुट्टे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. शरद बुट्टे हे आपल्या खासगी कामानिमित्त बाहेर गेले असता दबा धरून बसलेल्या काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. यानंतर नागरिकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात हलवले. शरद बुट्टे यांच्या डोक्याला व शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत असले तरी डॉक्टरांचे पथक सतत लक्ष ठेवून आहे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
दरम्यान, या घटनेनंतर आंबेठाण पाईट परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.
रोहित पवार यांचे राष्ट्रवादी अन् सुनित्रा काकींविषयी मोठं वक्तव्य…
पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात असलेली ‘दुसरी पत्नी’ अडचणीत…