मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे निकाल न लागल्याने शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत मुंबईत ठाकरे गटाला केवळ 65 जागांवर समाधान मानावे लागले असून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या राजकीय धक्क्यानंतर काही तासांतच शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार आणि ज्येष्ठ नेत्या नीला देसाई यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले.
नीला देसाई या शिवसेनेच्या जुन्या आणि निष्ठावंत नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या. ज्या काळात राजकारणात महिलांची उपस्थिती अत्यंत मर्यादित होती, त्या काळात बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्यावर विश्वास टाकत त्यांना संधी दिली होती. त्या शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार ठरल्या होत्या आणि विधान परिषदेच्या सदस्य म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
मुंबईतील निवडणूक निकालानंतर ठाकरे गटात निराशेचं वातावरण असतानाच देसाई यांच्या निधनाने पक्षावर शोककळा पसरली आहे. नीला देसाई यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय, सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर आज (शनिवार) दुपारी 12 वाजता अंत्यसंस्कार होणार असून, यावेळी शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.