पिंपरी-चिंचवड: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांचे चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर, पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण 128 जागांवरील थेट लढती आता समोर येत आहेत.
प्रभाग क्रमांक 16 (ब) – OBC महिला आरक्षित जागेवर कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही या जागेसाठी कंबर कसली असून, ही लढत अत्यंत चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
राजकीय विश्लेषकांच्या मते, माजी नगरसेवक तसेच या निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार मोरेश्वर भोंडवे आणि OBC महिला आरक्षित जागेसाठी त्यांच्या पत्नी जयश्री भोंडवे यांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या दोघांवर असलेला विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर मोठा गोंधळ निर्माण झाला. या वेळी जयश्री भोंडवे यांचा उमेदवारी अर्ज बाद व्हावा, यासाठी भाजप तसेच शिवसेना (शिंदे गट) यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले.
सूत्रांच्या माहितीनुसार, थेट निवडणूक लढवण्याऐवजी अर्ज बाद व्हावा यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे भाजप व शिवसेना (शिंदे गट) च्या कार्यपद्धतीबाबत प्रभागात तीव्र नाराजी पसरल्याचे चित्र आहे. दोन्ही पक्षांनी दिलेले महिला उमेदवार अपेक्षेइतके प्रभावी नसून, केवळ पक्ष आणि पॅनलच्या जोरावर निवडणूक लढवत असल्याची चर्चा प्रभागात सुरू आहे.
दरम्यान, प्रभाग क्रमांक 16 (ब) साठी भारतीय जनता पक्षाच्या बंडखोर उमेदवार आणि सध्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार प्रियंका घोजगे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जयश्री भोंडवे असा थेट सामना रंगण्याची दाट शक्यता आहे. एकेकाळचे मित्र पक्ष असलेल्या दोन्ही काँग्रेस पक्षांमध्ये ही लढत येत्या काळात प्रभाग पातळीवर अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या लढतीमागील राजकीय पार्श्वभूमी तितकीच रोचक आहे. काँग्रेसच्या उमेदवार प्रियंका घोजगे या मूळ (लोहार) समाजाच्या असल्याने, मूळ ओबीसींच्या प्रतिनिधित्वाचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून आपली उमेदवारी निश्चित केल्याची चर्चा आहे.
यापूर्वी त्या स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कट्टर समर्थक मानल्या जात होत्या. त्यांचे माहेर पिंपळे गुरव येथे असल्याने त्या जगताप कुटुंबाच्या निकटवर्ती समजल्या जातात. काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करताना लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या छायाचित्रास नतमस्तक होतानाचा व्हिडिओ सध्या प्रभागात चर्चेचा विषय ठरला आहे. प्रभागात त्यांचा जनसंपर्कही लक्षणीय असल्याचे दिसून येते. या नव्या उमेदवाराने अनुभवी आणि प्रभावशाली मोरेश्वर भोंडवे यांच्या पत्नीविरुद्ध थेट दंड थोपटल्याने, ही लढत अधिकच चुरशीची बनली आहे. पुरोगामी विचारसरणीचे मतदार आणि कार्यकर्ते कोणाच्या बाजूने कौल देतात, हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल.