मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा झटका…

eknath-shinde
Share

अहिल्यानगर : अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. सर्वाधिक म्हणजेच 54 उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या शिंदेसेनेच्या पाच उमेदवारांचे अर्ज छाननीअंती अवैध ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे निवडणूक रणांगणात शिंदेसेनेचे उमेदवार आता 49 वर आले असून, हा पक्षासाठी निवडणुकीपूर्वीच मोठा झटका मानला जात आहे.

अहिल्यानगर महापालिकेच्या 68 जागांसाठी एकूण 788 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. बुधवारी विविध निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत एकूण 17 अर्ज अवैध ठरवून बाद करण्यात आले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

शिंदेसेनेच्या पाच उमेदवारांचे अर्ज विविध कारणांमुळे बाद ठरले. एका उमेदवाराचा अर्ज अनुमोदकाची चुकीची स्वाक्षरी असल्याने, एका उमेदवाराचा एबी फॉर्म सादर न केल्याने, एका उमेदवाराने एबी फॉर्मची झेरॉक्स प्रत जोडल्याने, तर दोन उमेदवारांचे अर्ज एबी फॉर्मवर खाडाखोड व व्हाईटनरचा वापर केल्यामुळे अवैध ठरवण्यात आले. ऐनवेळी पक्षप्रवेश झालेल्या काही उमेदवारांच्या कागदपत्रांमध्ये तांत्रिक त्रुटी राहिल्याचे छाननीदरम्यान स्पष्ट झाले. या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), एमआयएम, आम आदमी पार्टी, बसपा तसेच अपक्ष उमेदवारांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले होते. सावेडी तहसील कार्यालय, जुने महापालिका कार्यालय, भूसंपादन कार्यालय, बुरुडगाव प्रभाग समिती, केडगाव उपकार्यालय आदी ठिकाणी उमेदवार, सूचक व अनुमोदकांच्या उपस्थितीत अर्जांची छाननी करण्यात आली.

छाननीदरम्यान काही उमेदवारांवर अतिक्रमण, महापालिकेची करथकबाकी, कागदपत्रांतील त्रुटी आदी स्वरूपाच्या हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. या हरकतींवर सुनावणी घेण्यात आली. सुनावणीनंतर बहुतांश हरकती फेटाळण्यात आल्या असल्या, तरी तांत्रिक त्रुटी असलेल्या अर्जांवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घेत अर्ज बाद केले. दरम्यान, शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या एका उमेदवाराचाही अर्ज अवैध ठरला आहे. मात्र, शिंदेसेनेच्या ज्या उमेदवारांचे पक्षीय अर्ज बाद झाले, त्यांचे अपक्ष अर्ज ग्राह्य धरण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *