ट्रिनिटी पॉलिटेक्निकमध्ये क्रीडा दिन उत्साहात साजरा…

trinity-polytechnic
Share

पुणे (संदिप कद्रे): ट्रिनिटी पॉलिटेक्निकमध्ये वार्षिक क्रीडा दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. या क्रीडा महोत्सवाला विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटन प्रसंगी कॉलेजचे प्राचार्य डॉ. शरद कांदे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, ‘खेळ हे केवळ शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी नसून व्यक्तिमत्त्व विकासासाठीही अत्यंत महत्त्वाचे आहेत. क्रीडा स्पर्धांमुळेविद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण आणि जिद्द निर्माण होते. अभ्यासासोबतच खेळांनाही तितकेच महत्त्व द्यावे.’

क्रीडा दिनानिमित्त कबड्डी, हॉलीबॉल, फुटबॉल क्रिकेट, रस्सीखेच,धावणे, अशा विविध मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी खेळांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत आपली क्रीडा कौशल्ये दाखवली. विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांना पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. यामध्ये खालील प्रमाणे पारितोषिक देण्यात आली.
क्रिकेट – प्रथम पारितोषिक – अनु विद्युत दूरसंचार अभियांत्रिकी संघ
हॉलीबॉल – प्रथम पारितोषिक – संगणक अभियांत्रिकी संघ
कबड्डी – प्रथम पारितोषिक – यांत्रिक अभियांत्रिकी संघ
रस्सीखेच- प्रथम पारितोषिक – विद्युत अभियांत्रिकी संघ
फुटबॉल- प्रथम पारितोषिक – प्रथम वर्ष अभियांत्रिकी संघ
धावणे- प्रथम पारितोषिक – वैष्णवी राठोड, तृतीय वर्ष संगणक विभाग.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

क्रीडा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा विभाग प्रमुख प्रा. अजय जाधव तसेच आदित्य लिंबोरे, प्रणय भोर, आदित्य कासार, कार्तिक भिसे, प्रथमेश काळभोर, अनुज चवळे, सार्थक फडतरे या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच विभाग प्रमुख प्रा. सचिन घुगे, प्रा.स्मिता जगताप, प्रा.भैरवनाथ जाधव प्रा.प्रतिक्षा सणस, प्रा.राहुल धोंगडे, प्रा.युवराज पवार हे उपस्थित होते.परीक्षक म्हणून जयदीप कटके कार्तिक कामठे,प्रणव कटके अमोल कटके,दीपक वारे यांचे सहकार्य लाभले. क्रीडा दिनामुळे विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, शिस्त व निरोगी जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित झाले. या क्रीडा महोत्सवासाठी संस्थेचे संस्थापक कल्याणराव जाधव व संकुल संचालक समीर कल्ला काय यांचे देखील मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *