पुणे : राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि राजकीय समीकरणं जुळू लागली आहेत. पिंपरीत भाजपच्या विरोधात सर्वपक्षीयांनी मोट बांधण्याची तयारी सुरू केल्याचे चित्र आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड परिसरात राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मुंबईत काँग्रेस आणि मनसेचे सुत जुळत नसले तरी पिंपरी चिंचवडमध्ये मात्र काँग्रेस आणि मनसेने सोबत येण्याचा निर्णय घेतला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये महाविकास आघाडीची बैठक घेण्यात आली, यात मनसेचे नेतेही सहभागी झाले होते. शिवाय महादेव जानकरांच्या रासपचेही नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे अजित पवार यांची राष्ट्रवादी आमच्या आघाडीत आली तरी आमची हरकत नाही, असे म्हणत या सर्व पक्षीयांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीलाही मविआत येण्याचे आमंत्रण धाडले आहे. पिंपरी चिंचवड शहरात पवार काका-पुतणे एकत्र येण्याच्या दृष्टीने पुढचं पाऊल पडल्याचे चित्र आहे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
भाजपच्या माजी नगरसेवक अश्विनी जाधव यांनी दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश घेतला आहे. तर भाजपने कामच केलं नाही, कोणता विकास केला नाही असा आरोप करत ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि माजी नगरसेवकांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर फायदा होईल, असे नवीन प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांचे मत आहे.