…अन् अजित पवार यांचा चेहरा चांगलाच खुलला

ajit-pawar
Share

नागपूर: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या यांच्या धाकट्या मुलाचा बहरीन येथे थाटामाटात विवाह सोहळा पार पडला. यावेळी अजित पवार यांनी सैराट चित्रपटातील झिंगाट गाण्यावर डान्स केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याविषयी अजित पवार यांना विचारले असता त्यांचा चेहरा चांगलाच खुलला.

हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. मात्र, यंदा प्रथमच विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहाचं कामकाज विरोधी पक्षनेत्यांशिवाय चालणार आहे. लेकाच्या लग्नानंतर अजित पवार आज पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले. त्यावेळी अजित पवारांना लेकाच्या लग्नातील डान्सचे कौतुक केले. त्यावेळी अजित पवार यांच्या प्रतिक्रियेने सगळ्यांचे लक्ष वेधले.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

नागपुरातील विधानभवनाच्या आवारात अजित पवार यांची मिश्किल शैली पाहायला मिळाली. अजित पवार आपल्या नेहमीच्या पेहरावात न येता, नागपूर विधिमंडळात अजित पवार यांची एन्ट्री सुट-बुट परिधान करुन झाली. यावेळी अजित पवार यांचा या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधले. यावेळी एका पत्रकाराने अजित पवार यांना दादा डान्स खूप छान होता, असे म्हणत कौतुक केले. पत्रकाराने दिलेली दाद ऐकताच दादांचा चेहरा खुलला आणि त्यांनी त्यावर स्मितहास्य केले. तर दादा पाय बरा आहे ना, अशी एकाने आपुलकीने चौकशी केली. त्यावर दादांनी हो ठीक आहे. काल स्प्रे मारला म्हणून आज आलो, कालपर्यंत जाम होता. माझी काळजी घेता त्यामुळे बरं वाटतं, असं म्हणत दादांनी उपस्थितांची मने जिंकली.

दरम्यान, अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार आणि ऋतुजा पाटील हे दोघे 5 डिसेंबर रोजी बहरीन येथे विवाहबंधनात अडकले आहेत. या सोहळ्याला पवार–पाटील कुटुंबीयांकडून 400 पाहुण्यांना निमंत्रण पाठण्यात आले होते. सुप्रिया सुळे यांनी शेअर केले जय पवार यांच्या लग्नातले काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. जय पवार यांच्या वरातीत रोहित पवार यांचा झिंगाट डान्स सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *