पक्ष तुझ्या काकाचा झालाय का? अजित पवारांच्या टीकेला कडक उत्तर…

ajit-pawar
Share

बीड: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये प्रचारसभा घेत नुकतेच भाजपवासी झालेल्या योगेश क्षीरसागर यांच्यावर टीकास्र सोडले होते. निवडणुकीआधी एबी फॉर्म मागण्यावरून त्यांनी टीका केली. पक्ष काय तुझ्या काकाचा झालाय का? असा खोचक सवाल अजित पवार यांनी विचारला होता. तसेच मागच्या ३०-३५ वर्षात बीडचं वाटोळ झाल्याचेही त्यांनी म्हटले होते.

अजित पवार यांच्या या टीकेला आता स्वत: योगेश क्षीरसागर यांनी कडक शब्दांत उत्तर दिले आहे. पक्ष माझ्या काकाचा नाही. पक्ष तुमच्याच काकाचा आहे. फक्त तो व्यवस्थित चालवा, अशा शब्दात योगेश क्षीरसागर यांनी अजित पवार यांच्यावर पलटवार केला आहे. दादा म्हणतात पक्ष काय तुमच्या काकाचा नाही.. मला एवढंच सांगायचे मी काही तो दावाही केला नाही. तो त्यांच्याच काकाचा पक्ष आहे. त्यांनी तो पक्ष नीट हँडल करावा. एवढ्याच त्यांना शुभेच्छा आहेत, अशी उपरोधिक टोलेबाजी योगेश क्षीरसागर यांनी केली आहे.

‘मागील 35 वर्षांमध्ये पाच सात निवडणुका झाल्या. निवडणुकीमध्ये लोकांनी आम्हाला स्वीकारला आहे. या 35 वर्षांमध्ये त्यांच्याकडे जे उमेदवार आहेत, तेही आमच्याकडेच होते मग त्यांनी त्यावेळेस विरोध का केला नाही? एबी फॉर्मचे तर मी नाव सुद्धा काढलं नव्हतं. फक्त उमेदवार चांगले असावेत. शहराला परत त्रास देणारे नसावेत. पक्षात अगोदरच उमेदवारीवरून गोंधळ सुरू होता. उमेदवारी अर्ज भरण्याच्या 4 दिवस अगोदर आम्हाला साधी विचारणा सुद्धा केली नव्हती. संघटनेमध्ये गोंधळ आहे. तो येणाऱ्या कालावधीमध्ये खूप मोठा लॉस पक्षाचा होईल. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर काका यांनी उमेदवारला पाठिंबा दिलेला आहे. सभा देखील चांगली झाली. त्यामुळे सहाजिकच ताकद वाढली आहे. बीड नगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता येईल, असा विश्वासही योगेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला. तसेच मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील प्रचारासाठी बीडमध्ये येणार असल्याचे डॉ. योगेश क्षीरसागर यांनी सांगितले.

अजित पवार भरसभेत संतापले, थेट हातात माईक घेतला अन् म्हणाले…

मोठी बातमी! पुण्यातील जमिनीचा व्यवहार रद्द, अजित पवार म्हणाले…

Buy Political Social Media Book WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
WhatsApp : 93712 69949

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *