पाटणा (बिहार): बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या दारुण पराभवानंतर यादव कुटुंबात दुफळी निर्माण झाली आहे. लालू प्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी ट्विट करत कुटुंबाशी संबंध तोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
I’m quitting politics and I’m disowning my family …
This is what Sanjay Yadav and Rameez had asked me to do …nd I’m taking all the blame’s— Rohini Acharya (@RohiniAcharya2) November 15, 2025
एका पोस्टमध्ये त्यांनी राज्यसभा खासदार संजय यादव यांचा उल्लेख करत म्हटले आहे की, “मी सर्व दोष स्वतःवर घेत आहे. मी राजकारण सोडत आहे आणि माझ्या कुटुंबाशी संबंध तोडत आहे. संजय यादव आणि रमीज यांनी मला हे करण्यास सांगितले आणि मी सर्व दोष स्वतःवर घेत आहे.” आचार्य यांनी सुरुवातीला फक्त राजकारण सोडण्याबद्दल आणि कुटुंबाशी संबंध तोडण्याबद्दल लिहिले होते. तथापि, नंतर मजकूर संपादित करून संजय यादव आणि रमीज यांचं नावे समाविष्ट करण्यात आले. दरम्यान, लालू प्रसाद यादव किडनी विकाराने त्रस्त असताना मुलगी रोहिणी यांनी आपली एक किडनी दान केली होती.