बिहारमध्ये भाजपला धक्का; NDAला अभूतपूर्व आघाडी…

Bihar-Election
Share

पाटणा (बिहार): बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे. आज (शुक्रवार) सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरु झाली आहे. मतमोजणीच्या सुरवातीला भाजपला धक्का तर NDAला अभूतपूर्व आघाडी मिळत असल्याचे दिसत आहे.

बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार आपली सत्ता कायम राखणार की तेजस्वी यादव सत्तांतर घडवणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी एनडीए आणि महागठबंधन यांच्यात महत्त्वाची लढत आहे. तिसरा पक्ष जनसुराज देखील पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरला आहे. बिहार विधानसभेत एकूण 243 जागा आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीकडे किमान 122 जागा आवश्यक आहे. एनडीएतील भाजप आणि जेडीयू प्रत्येकी 101 जागांवर निवडणूक लढवत आहे. तर लोक जनशक्ती पार्टी 29 जागांवर आणि आरएलएम, एचएएम प्रत्येकी 6 जागांवर निवडणूक लढवत आहेत.

बिहारमध्ये मतमोजणीला सुरूवात होऊन दोन तास झाले आहे. सुरुवातीचे कल हे राज्यात पुन्हा एकदा एनडीएचे सरकार येणार असल्याचे दिसत आहे. अशात भाजपने राज्यात पुन्हा एकदा नितीश कुमार हेच नेतृत्व करतील असे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, महाआघाडी अंदाजे ३८ जागांवर आघाडीवर आहे. जर हा ट्रेंड असाच सुरू राहिला तर ही लढत चुरशीची मानली जाणार नाही. प्रशांत किशोर यांचा जन सूरज सध्या दोन जागांवर आघाडीवर आहे. व्हीआयपींना अद्याप खाते उघडलेच नाही.

Buy Political Social Media Book
Buy Political Social Media Book

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *