शरद पवार यांचा परळीत धनंजय मुंडेंना मोठा धक्का…

sharad-pawar
Share

बीड : शरद पवार यांनी परळीत धनंजय मुंडेंना मोठा धक्का दिला असून, परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी परळी नगरपरिषदेत विकास कामात भ्रष्टाचाराचे आरोप करत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी खासदार बजरंग सोनवणे, आमदार जितेंद्र आव्हाड, पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ फड उपस्थित होते.

परळीतील नगराध्यक्षपदाची जागा सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी राखीव असल्याने त्यांच्या पत्नी संध्या देशमुख ही निवडणूक लढवणार आहेत. मी पक्षनिष्ठ नसून व्यक्तीनिष्ठ माणूस असल्याने मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावेळी त्यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख म्हणाले की, ‘मी व्यक्तीनिष्ठ माणूस आहे, पक्षनिष्ठ नाही. येथील आमदार, सत्ताधाऱ्यांचे काम पाहिले, कोणतेही विकास कामी केले नाही. आम्ही वारंवार ही बाब वरिष्ठांच्या कानावर घातल्यावरही यावर कुठला मार्ग निघाला नाही. यामुळे परळीतील नगराध्यक्षपदाची जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी सुटल्याने मी माझ्या पत्नी संध्या देशमुख यांचा उमेदवार म्हणून प्रचार सुरू केला आहे. गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या वादामध्ये माझे तिकीट कापले गेले होते. त्यानंतर मी अपक्ष उभा राहिलो. यात कोणीही श्रेय घ्यायचे काम नाही. परळीतील अर्धवट विकासकामांमुळे मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सहा महिन्यापासून मी या कामाला लागलो होतो. मी लोकसभेला पंकजा मुंडे यांचे काम केले. त्यानंतर विधानसभेला धनंजय मुंडे यांचे काम केले. परळीत होत असलेल्या बोगस मतदानाबाबत मी धनंजय मुंडे साहेबांना सांगितले होते की, आपण निवडून येऊ. पण, हे प्रकार थांबवले पाहिजेत. पण त्यावर त्यांनी काहीही केले नाही. मी गेल्या दीड महिन्यापासून प्रचार करत आहे. परळीतील जनता माझ्यासोबत आहे.’

आजोबा शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्याविरुद्ध पुकारला राजकीय एल्गार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *