चर्चांना उधाण! राष्ट्रवादीच्या मंचावरून शिवाजी आढळराव पाटील यांनी कोणाचा केला प्रचार…

shivajirao-adhalrao-patil
Share

पुणे: लोकसभेवेळी शिवबंधनाच्या हाती घड्याळ बांधलेल्या शिवाजी आढळराव पाटिल यांच्या मनात अजून ही धनुष्यबाणचं आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मंचर नगरपंचायत निवडणुकीच्या एका सभेमुळे हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

शिंदेंच्या शिवसेने विरोधात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने ही सभा आयोजित केली होती. यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडून घड्याळ अन धनुष्यबाण अशा दोन्ही चिन्हाचा प्रचार झाला. घडाळाचं बटन दाबा म्हणण्यापूर्वी आढळराव पाटील यांच्या तोंडून धनुष्य असा उल्लेख झाला. मग धनुष्यबाण काय? असे आढळराव म्हणताच ते तुमच्या मनातून काय जाणार नाही, अशी मिश्किल टिप्पणी उपस्थितांमधून करण्यात आली. यावर आढळराव पाटील यांनी असं काही नाही, मला धनु मोरडे म्हणायचं होते, असे म्हणत सावरण्याचा प्रयत्न केला.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

मंचरमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भाजप सोबत युती केली आहे. त्यांचा सामना थेट शिंदेंच्या शिवसेनेसोबत आहे, अशा प्रसंगी एकनाथ शिंदे यांचे विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आढळराव नेमका कोणाचा प्रचार करणार? घड्याळाचा की धनुष्यबाणाचा? अशी चर्चा रंगलेली असताना राष्ट्रवादी आणि भाजप युतीने सभेचे आयोजन केले. पण, भाषणात आढळराव यांनी घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबा म्हणण्यापूर्वी धनुष्य असा उल्लेख केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, ‘आम्हाला बरं वाटतंय की आम्ही काम करतोय, लोक आम्हाला सांगत आहेत, मंचरमध्ये हे कधी झालं नव्हतं ते आता होत आहे, मंचर शहर जरी मोठं असलं तरी चांगली परंपरा या शहराला आहे. विरोधाला विरोध करायचा म्हणून मंचर विरोध करत नाही, मला आठवतं मी पहिल्यांदा निवडणुकीला उभारलो होतो, माजी खासदार कैलासवासी किसन राव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते, माझा पक्ष कुठला आणि त्यांचा पक्ष कुठला याचा विचार न करता, अतिशय खंबीरपणे माझ्या पाठीमागे उभे राहून त्यांनी 2004 ते 2009 या निवडणुकीमध्ये साथ दिली, त्यावेळी त्यांनी कोणत्याही राजकीय परिणामांची पर्वा केली नाही, ही मंचरची संस्कृती आहे, म्हणून मला आपल्याला सांगायचे हे निवडणूक तुमच्या आमच्या दृष्टीने नव्हे तर येणाऱ्या पिढीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे, येणाऱ्या पिढीला मंचर शहराकडून काहीतरी मिळालं पाहिजे, आपल्याला मंचर शहर उभा करायचं आहे, हे करण्यासाठी येणाऱ्या दोन तारखेला आपण धनु… घड्याळ आणि कमळ… धनुष्यबाण असं काही नाही, तेव्हा उपस्थितांमधून म्हटलं गेलं तुमच्या मनातून काय जाणार नाही तेव्हा आढळराव म्हणाले असं काही नाही, मला सांगायचं धनु मोरडे असं म्हणायचं होतं मला, आणि म्हणून सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजपा युतीच्या उमेदवारांना विजय करा.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *