पुणे : कविता कमी वाचली जाते; पण जर तिचे गीत झाले तर ती अनेकांपर्यंत पोचते, ऐकली जाते. मराठी साहित्यात असे सृजनशील प्रयोग गरजेचे आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी चंद्रकांतदादा वानखेडे यांनी केले.
समर्थ फाऊंडेशन आणि वल्लरी मीडिया यांच्या वतीने गीतकार दीपा केळकर यांच्या अकरा गीतांचा ”स्वर पारिजात’’ या म्युझिक अल्बमची निर्मिती करण्यात आली. या अल्बमच्या लोकार्पण समारंभात वानखेडे बोलत होते. भारत इतिहास संशोधक मंडळाच्या पोतदार सभागृहात हा समारंभ पार पडला.
या प्रसंगी समर्थ फाऊंडेशनचे किरण इनामदार, गीतकार दीपा केळकर आणि यशदाचे अधिकारी व्यंकटेश कल्याणकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘स्वर पारिजात’मधील गीतांची झलक यावेळी उपस्थितांना ऐकविण्यात आली. चंद्रकांतदादा वानखेडे यांच्या बहारदार काव्यसादरीकरणाने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. यावेळी बोलताना किरण इनामदार यांनी ‘स्वर पारिजात’ या संकल्पनेमागील भूमिका स्पष्ट केली.
व्यंकटेश कल्याणकर म्हणाले,“कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या जगात माणसांना एकत्र आणून अभिनव कलाकृतीचा उत्सव साजरा करणारे असे सोहळे कदाचित मानवी संस्कृतीच्या इतिहासातील शेवटच्या काही समारंभांपैकी एक असावेत. यावेळी ज्येष्ठ लेखिका वंदना बोकील, माधुरी जोशी, केतकी देशपांडे यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री ज्योती मनोहर यांनी केले. कार्यक्रमाला केळकर कुटुंबीय, मित्रपरिवार आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साहित्यामध्ये राजसत्ता उलथून टाकण्याची क्षमता : मेधा कुलकर्णी
उत्तम साहित्यनिर्मितीसाठी मनाची मशागत आवश्यक : स्वाती महाळंक
प्रतिभावंत कवींना प्रोत्साहित करणे गरजेचे : चंद्रकांत वानखेडे